पुणे : राज्याचे लक्ष लागलेल्या चिंचवड पोटनिवडणुकीचा निकाल अखेर समोर आला आहे. भाजप उमेदवार अश्विनी जगताप या मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्या आहेत. अश्विनी जगताप यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार नाना काटे यांचा पराभव केला.
कसब्यानंतर चिंचवड मतदारसंघाकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. सकाळी 8 पासून मतमोजणीला सुरुवात झाली असून पहिल्या फेरीपासूनच अश्विनी जगताप आघाडीवर होत्या. अखेर यात अश्विनी जगाताप यांनी बाजी मारली आहे. अश्विनी जगताप यांनी 1 लाख 35 हजार 434 मतांनी विजयी झाल्या आहेत. तर, नाना काटे यांना 99 हजार 343 मते मिळाली आहेत. तर, बंडखोर आमदार राहुल कलाटे यांना 44 हजार 082 मते मिळाली आहेत.
दरम्यान, विजयी झाल्यानंतर भाजपा आमदार अश्विनी लक्ष्मण जगताप ह्यांनी लक्ष्मण जगताप यांच्या स्मृती स्थळावर जाऊन दर्शन घेतले. यावेळी अश्विनी जगताप यांना अश्रु अनावर झाले. संपूर्ण कुटुंबीय आणि कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत त्यांनी या स्मृती स्थळावर जाऊन दर्शन घेतले. अश्विनी जगताप तसेच त्यांच्या कन्या ऐश्वर्या यांना यावेळी अश्रू अनावर झाले. कोणताही जल्लोष न करता विजयाचा आनंद त्यांनी व्यक्त केला.