Navab Malik  Team Lokshahi
राजकारण

नवाब मालिकांच्या अडचणी वाढणार? वाशीम कोर्टाने पोलिसांना दिले 'हे' आदेश

समीर वानखेडेंनी या प्रकरणी वाशिम सत्र न्यायलयात याचिका दाखल केली होती.

Published by : Sagar Pradhan

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक हे अनेक महिन्यांपासून मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात जेलमध्ये आहे. मात्र, आता त्यांना पुन्हा एक झटका कोर्टाने दिला आहे. नवाब मलिक यांच्या विरोधात अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करा, असा आदेश वाशिम कोर्टाने पोलिसांना दिला आहे. एनसीबी मुंबई झोनलचे माजी डायरेक्टर समीर वानखेडे यांनी कोर्टात याचिका दाखल केली होती. याच याचिकांवर कोर्टाने पोलिसांना नवाब मलिकांच्या विरोधात अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिले आहे.

अभिनेता शाहरुख खान यांचा मुलगा आर्यन खानला क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी अटक केली होती. त्यावेळी समीर वानखेडे मुंबई एनसीबीचे झोनल डायरेक्टर होते. हे प्रकरण त्यावेळी प्रचंड गाजले होते. या प्रकरणामुळे राजकारण एकदम तापले होते. मात्र, आर्यन खानचे समर्थन करत नवाब मलिक यांनी समीर वानखडे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी कारवाईचा बनाव रचला होता, असा आरोप समीर वानखडेंवर मलिक यांनी लावला होता.

पुढे हे प्रकरण एवढे तापले की, समीर वानखडे यांच्या विरोधात दावे करताना मलिक यांनी वानखडे यांच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित दावे केले होते. त्यांनी समीर वानखेडे यांच्या वैयक्तिक आयुष्यातील जुने फोटो त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर शेअर केले होते. त्यांनी वानखेडेंच्या पहिल्या लग्नाचा फोटो शेअर केला होता. विशेष म्हणजे नवाब मलिक यांच्या पहिल्या लग्नाचा फोटो शेअर केला होता. तसेच मलिक यांच्या जातीचे कादगपत्रे समोर आणत त्यांनी खोटे कागदपत्रे सादर करत नोकरी मिळवल्याचा गंभीर आरोप केला होता. त्यावरच समीर वानखेडेंनी या प्रकरणी वाशिम सत्र न्यायलयात याचिका दाखल केली होती. या याचिकेत त्यांनी नवाब मलिकांविरोधात अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी