नागपूर जिल्हा बँक घोटाळ्यात 5 वर्षांच्या शिक्षेनंतर आता सुनील केदार यांची आमदारकी धोक्यात आली आहे. सुनील केदार यांची आमदारकी रद्द होणार असल्याची सूत्रांची माहिती दिली आहे. नागपूर पोलिसांनी कोर्टाचे आदेश विधिमंडळास पाठवले असल्याची माहिती मिळत आहे.
केदार यांच्या आमदारकीचा निर्णय आता विधानसभाध्यक्षांच्या कोर्टात आहे. लोकप्रतिनिधीला कुठल्याही कोर्टाने 2 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक शिक्षा सुनावल्यास त्याचे सदस्यत्व रद्द होईल असा सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे.
या पार्श्वभूमीवर सुनील केदार यांचंही सदस्यत्व रद्द होण्याची शक्यता आहे. कायद्याने आमदारांना २ वर्षांपेक्षा अधिक शिक्षा झाल्यास त्यांची आमदारकी रद्द होते.