महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वात मोठा भूकंप झाला. २ जुलै २०२३ या दिवशी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांनी शपथ घेतली. या घडामोडीनंतर आता अजून एक चर्चा रंगली आहे. ती म्हणजे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार? या चर्चांना उधाण आले आहे.
याच पार्श्वभूमीवर दिल्लीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना यावर प्रश्न विचारण्यात आला. उत्तर देत शरद पवार हसत म्हणाले की, शरद चांगली गोष्ट आहे. त्यामुळे आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का? हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.