निस्सार शेख | मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीमध्ये रिसॉर्ट बांधण्यासाठी शिवसेनेचे नेते व माजी मंत्री अनिल परब यांनी सागरी किनारा नियमांचे उल्लंघन करून आणि विनापरवानगी दापोलीत रिसॉर्ट बांधले आहे, असा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी यापूर्वी अनेकदा केला आहे. पण, आता दापोलीतील रिसॉर्ट दोन-चार दिवसांत पाडण्याचा अंतिम आदेश अपेक्षित आहे, असं सोमय्या यांनी म्हंटलं आहे.
अनिल परब यांनी शेतजमिनीच्या वापराबदल अवैधरित्या बिगरशेती करून घेतला, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. दापोलीतील रिसॉर्ट दोन-चार दिवसांत पाडण्याचा अंतिम आदेश अपेक्षित आहे, असं किरीट सोमय्या यांनी म्हंटलं आहे. या संदर्भात पर्यावरण मंत्रालयाकडे पाठपुरावा करत असल्याचं त्यांनी सांगितलं. सोमय्या यांनी ट्वीट करत याबाबत माहिती दिली.
याआधी ईडीने दापोली रिसॉर्ट संदर्भातील कथित जमीन व्यवहार घोटाळ्याप्रकरणी परब यांच्यावर कारवाई केल्याचं म्हटलं जात आहे. या रिसॉर्टवर कारवाई व्हावी, अशी मागणी केली असल्याचं किरीट सोमय्यांनी केली होती. त्यामुळं राऊतांनंतर ईडी अनिल परबांवर सुद्धा कारवाई करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
दरम्यान, किरीट सोमय्यांनी काहीच दिवसांपुर्वी पत्र लिहीत वादग्रस्त साई रिसॉर्ट पाडण्याची विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. उद्धव ठाकरेंचा उजवा हात असणारे राऊत जसे तुरुंगात गेले तसा डावा हातही तुरुंगात जाणार, असे विधानही किरीट सोमय्यांनी केले होते. यामुळे मलिक, देशमुख व राऊतांनंतर आता पुढील नंबर कोणाचा? अशी सध्या सध्या चर्चा सुरु असताना, पुढील नंबर शिवसेना नेते अनिल परबांवर कारवाई होणार का? हे येणार काळच ठरवेल.