लोकशाही मराठी' या मराठी न्यूज चॅनलतर्फे 'लोकशाही संवाद 2024' संवाद महाराष्ट्राच्या प्रगतीचा या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात महाराष्ट्रातील नामवंत पाहुणे उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थिती लावली आहे. यावेळी त्यांनी 4 तासात गोवा, सिंधुदुर्गला जाता येईल अशी माहिती त्यांनी दिली आहे.
ते म्हणाले की, मुंबई गोवा हा मार्ग नॅशनल हायवेचा आहे. परंतु आम्ही आता पुर्ण लक्ष दिलं आहे. जसं भिवंडी नाशिक ठाणे यावरही लक्ष दिलं आहे. मी स्वत गेलो होतो तिकडे. मुंबई गोवा हायवे दोखील लवकर पूर्ण होईल. त्याचा देखील फायदा लोकांना होइल.
नितिन गडकरी यांनी खुप प्रयत्न केले. एका कॉनस्ट्रॅक्टरला 5कोटी लोन देखील काढून दिले. कॉनस्ट्रॅक्टर खराब झाले मिळाले त्या रस्त्याची दूरावस्था झाली. असा इतिहास आहे. त्यावर देखील आम्ही लक्ष देत आहोत. मुंबई गोवा हायवे दुरुस्त होइल पण आम्ही मुंबई गोवा हा मुंबई पुणे आणि मुंबई नागपूर प्रमाणे एक्सेस कंट्रोल, सुपर एक्सप्रेस आम्ही करतोय. त्याचा DPR तयार झालेला आहे. तुम्हाला 4 तासात आता गोवा, सिंधुदुर्गला जाता येईल.
तसचं 17 तारखेला लाडकी बहिण योजनेचे 2 हफ्ते जमा होणार आहेत. लाडकी बहिण योजना फक्त रक्षाबंधनापुरती नाही आहे ही कायमस्वरुपी आहे. दिड कोटी महिलांचे अर्ज आले आहेत. ‘लाडकी बहिण योजना’ लाडक्या बहिंणींसाठी माहेरचा आहेर आहे, आणि हा आहेर तात्पुरता नाही तर कायमस्वरूपी आहे अशी माहिती देखील त्यांनी दिली आहे.