दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतील अभिनेते प्रकाश राज (PRAKASH RAJ) हे आपल्या राजकीय भूमिकांसाठी कायम चर्चेत असतात. ते कायम केंद्र सरकारच्या धोरणांवर टीकाटिपणी करत असतात. याआधीही त्यांनी केंद्र सरकार वर नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्यावर टीका केली आहे. नुकतेच पुन्हा एकदा त्यांनी अमित शहा (AMIT SHAHA) यांच्या संदर्भात ट्विट केला आहे. तेच ते खूप चर्चेत आहे. त्यामध्ये त्यांनी आमची घर तोडू नका, असे आवाहन अमित शहा यांना केली आहे.
अमित शाह यांनी नुकतंच हिंदी भाषेविषयी आपली मतं व्यक्त केली आहेत. हिंदी भाषा ही इंग्रजी भाषेला पर्याय म्हणून वापरावी. स्थानिक भाषांना पर्याय म्हणून नव्हे, असं मत अमित शाह यांनी व्यक्त केलं होतं. यावरूनच प्रकाश राज यांनी एक प्रकारची विनंती केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे केली आहे. प्रकाश राज आपल्या ट्वीटमध्ये म्हणतात, “आमची घरं तोडू नका मिस्टर होम मिनिस्टर. We dare you …हिंदीची बळजबरी थांबवा. आम्हाला आमची विविधता प्रिय आहे. आम्हाला आमच्या मातृभाषेविषयी प्रेम आहे. आम्हाला आमची ओळख प्रिय आहे.”
अमित शहा या विषयी भाष्य करताना असे म्हटले होते की, विविध राज्यातील लोक एकमेकांशी संवाद साधताना हिंदीचा वापर करतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठरवले आहे की, सरकार चालविण्याचे माध्यम हे राजभाषा हवे. त्यामुळे हिंदीचे महत्त्व नक्कीच वाढेल. जेव्हा वेगवेगळ्या भाषा बोलणारे भारताचे नागरिक एकमेकांशी संवाद साधतात, त्यावेळी तो भारतीय भाषेत असायला हवा. अमित शहा यांनी हिंदी भाषा ही इंग्रजी भाषेला पर्याय म्हणून वापरायला हवी स्थानिक भाषेला नाही, असे स्पष्ट केले.