लोकशाही मराठी' या मराठी न्यूज चॅनलतर्फे 'लोकशाही संवाद 2024' संवाद महाराष्ट्राच्या प्रगतीचा या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात महाराष्ट्रातील नामवंत पाहुणे उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी महाराष्ट्राच्या शिक्षणामध्ये कोणत बदल होण आवश्यक आहे यावर भाष्य केलं आहे.
महाराष्ट्राच्या शिक्षणामध्ये कोणत बदल होण आवश्यक आहे ज्याने शिक्षणाचा दर्जा उंचावेल सोबतच महाराष्ट्र्राच भविष्य उज्वल होईल यावर बोलताना ते म्हणाले की,
महाराष्ट्राच्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये गुणवत्ता वाढवायचे असेल तर शिक्षकांची गुणवत्ता वाढवली पाहिजे. शिक्षण क्षेत्रात जेवढे शिक्षक आणि विद्यार्थी आहेत त्याचबरोबर अधिकारी वर्ग यांना फिल्डवर पाठवण्यात आले आहे. प्रत्येक शाळांना ते भेट देणार आहेत. आपल्याकडे 2 कोटी मुलं शिक्षण घेत आहेत. त्यांच्या चाचणी परीक्षा घेतल्या जातील, कुठल्या विषयामध्ये ते कमी आहेत आणि त्या विषयावर लक्ष दिलं जाईल. मुलांना कवायतीची सवय लागली पाहीजे त्याचबरोबर समाजिक बांधिलकी वाढली पाहिजे. त्याचबरोबर कृषी हा विषय आम्ही अनिवार्य केलं आहे. एग्रीकल्चर कॉलेजमध्ये मुलं सध्या जात नाहीत ही वस्तुस्थिती आहे.
जागतिक मंदीमध्ये रशिया सारखा देश कोसळला पण भारत जागरूक राहिला. मुंबईचा पालकमंत्री असल्यामुळे जर्मनी सोबत करार झाला यामध्ये जर्मन भाषा शिकवण्याच्या उपक्रमाला सुरुवात झाली आहे. आठवीपासूनच जर्मन भाषा शिकवण्यात येत आहे त्यामुळे बारावी झालेल्या मुलगा थेट नोकरीला लागेल. तिथे अडीच लाख रुपये पगार आहे, त्यामुळे एखादा विद्यार्थी तिथे गेला तर वर्षाला 30 लाख रुपये कमवू शकतो.यामुळे आपला जीडीपी कितीतरी पटीने वाढणार आहे.
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा कधी मिळेल? यावर ते म्हणाले की,
हा केंद्र शासनाचा भाग आहे. हा दर्जा मिळावा म्हणून आपण ज्ञानेश्वार मुळेजी आपले सनदी आधिकारी आणि उत्कृष्ट साहित्यक त्यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी नेमली आहे. ते सातत्याने पाठपुरवठा करत आहेत. लवकरात लवकर दर्जा मिळावा ही सर्वांचीच भावना आहे. त्यासाठी स्वत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री प्रयत्न करत आहेत. ते लकरच प्राप्त होईल याची मला खात्री आहे.