राजकारण

आम्ही नास्तिक नाही; अजित पवार का म्हणाले?

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मंगेश जोशी | जळगाव : विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी अमळनेर येथील प्रसिद्ध मंगळ ग्रह मंदिराचे दर्शन घेतले व मंगळ ग्रहाची पूजा करून अजित पवारांनी मंदिराच्या परिसराची पाहणी केली. यावेळी अजित पवार चांगलेच भडकलेले पाहायला मिळाले. आम्ही नास्तिक नाही, अशा शब्दात त्यांनी एकाला सुनावले आहे.

नेमके काय घडलं?

राष्ट्रवादी काँग्रेस ग्रंथालय विभागाच्या वतीने जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे राज्यस्तरीय कार्यकर्ता शिबिर व कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलेले होते व या कार्यशाळेत राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, विरोधी पक्ष नेते अजित पवार प्रदेशाध्यक्ष आणि जयंत पाटील यांची उपस्थिती होती. दरम्यान शिबिरानंतर अजित पवार यांनी अमळनेर येथील प्रसिद्ध मंगळ ग्रह मंदिराचे दर्शन घेतले व मंगळ ग्रहाची पूजा करून अजित पवारांनी मंदिराच्या परिसराची पाहणी केली.

मंदिरातून बाहेर पडल्यानंतर मंगळ ग्रहाची पूजा करून प्रसार माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नावर अजितदादा चांगलेच भडकले. आम्ही नास्तिक नाही, असे उत्तर देत यापूर्वी देखील उपमुख्यमंत्री असताना मंगळ ग्रह मंदिरावर आपण आलो असल्याचे अजित पवारांनी सांगितले. तसेच, आज अमळनेर येथील शिबिरानंतर मंगळ ग्रह मंदिराच्या विश्वस्तांनी मंदिराला भेट देण्याची विनंती करत आपण मंदिराला भेट देऊन मंगळ ग्रहाचे दर्शन घेतल्याचे अजित पवार सांगितले आहे.

Pitru Paksha: पितृपक्षात कावळ्याला जेवण दाखवलं जाते, काय आहे पितृपक्षाशी कावळ्याचा संबंध? जाणून घ्या...

Laapataa Ladies: किरण रावच्या 'लापता लेडीज'ची 'ऑस्कर'साठी निवड; फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाने केली पुष्टी

SL vs NZ: प्रभात सूर्याने रचिन रवींद्रची मेहनत घालावली वाया; श्रीलंकेचा न्यूझीलंडवर दमदार विजय

Navra Majha Navsacha 2 Movie Review: "नवरा माझा नवसाचा 2" यंदाच्या ट्रेनच्या प्रवासाला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम

Netflix Squid Game 2: "स्क्विड गेम 2" चा ट्रेलर रिलीज; 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला