मुंबई : महाराष्ट्र विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदार संघाच्या जागेसाठी आज मतदान होत आहे. सकाळी 8 ते सायंकाळी 4 या वेळेत हे मतदान होईल. या मतदानास शिक्षक मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देताना दिसत आहे. मतदान शांततेत पार पडावे यासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त करण्यात आला आहे. यामध्ये विशेष लक्ष नाशिक पदवीधर मतदारसंघाकडे असून सत्यजित तांबे विरुध्द शुभांगी पाटील अशी जोरदार लढत होणार आहे. आपापल्या विजयासाठी सर्वच उमेदवारांनी कंबर कसली असून 2 फेब्रुवारीला मतमोजणी होईल.
विधान परिषद कोणा विरूद्ध कोण?
कोकण शिक्षक मतदार संघ
बाळाराम पाटील ( शेकाप)
ज्ञानेश्वर म्हात्रे ( भाजप)
औरंगाबाद शिक्षक मतदारसंघ
विक्रम काळे ( राष्ट्रवादी)
किरण पाटील ( भाजप)
नाशिक पदवीधर
सत्यजित तांबे (अपक्ष)
धनराज विसपुते (अपक्ष)
धनंजय जाधव (अपक्ष)
शुभांगी पाटील ((मविआ-शिवसेना)
नागपूर शिक्षक
गंगाधर नाकाडे (मविआ-शिवसेना)
नागो गाणार ( भाजप पाठींबा)
अमरावती पदवीधर
धीरज लिंगाडे (मविआ - कॉग्रेस)
डॉ. रणजित पाटील ( भाजप उमेदवार)