राजकारण

Vote For Amit Thakrey: अमित ठाकरे यांना मत का द्यावं?; संजय मोने यांची पोस्ट व्हायरल

काही कलाकार आता निवडणुकीच्या प्रचारात उतरले आहे.या कलाकारांनी केलेलं राजकीय वक्तव्य किंवा सोशल मिडीयावरील पोस्ट हा चर्चेचा विषय ठरतोय.

Published by : Team Lokshahi

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी सर्वच पक्षाचे नेते मैदानात उतरले आहेत. यात आता चित्रपटसृष्टीतील लोकही सहभागी होत असतात. काही कलाकार तर आता राजकीय पक्षांचा भागही झाले आहेत. या कलाकारांनी केलेलं राजकीय वक्तव्य किंवा सोशल मिडीयावरील पोस्ट हा चर्चेचा विषय ठरतो.

अशातच आता मनसेच्या उमेदवारांच्या प्रचारांसाठी अनेक कलाकार पुढे सरसावल्याचं दिसतंय. मुंबईतील माहिम मतदारसंघामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे हे विधानसभा रिंगणात उतरले आहेत. अमित ठाकरे हे पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक लढवत असल्याने त्यांच्यासाठी ज्येष्ठ अभिनेतेसंजय मोने यांनी एक फेसबुक पोस्ट केली आहे जी सध्या चांगलीच व्हायरल होतेय.

संजय मोने यांनी अमित ठाकरेंना मतदान का करावे याची 10 कारणे दिली आहेत. त्याचसोबत त्यांना मत का देऊ नये याचं केवळ 1 कारण सापडल्यांचं मोने यांनी लिहीलं आहे.

संजय मोने यांनी फेसबुक पोस्टमध्ये नेमकं काय लिहीलंय?

"माझी सर्व कलाकारांना विनंती आहे. तुमचे विचार समाज ऐकतो, तुमची वाह वाह करतो. याचा अर्थ असा नाही कि तुम्ही म्हणाल ते सगळे लोक ऐकतील. आपल्या कलाकारांना समाज फक्त आणि फक्त एक मनोरंजन करणारी व्यक्ती म्हणून ओळखतो. तुम्ही गंभीर भूमिका करा किंवा विनोदी भूमिका करा तुम्ही फक्त काही क्षणांचं, त्यांचं वेळ घालवायचं एक खेळणं असता. कधीही तुमच्या खांद्यावर हात टाकून एक सेल्फी घेण्याइतकीच तुमची किंमत असते. तेव्हा या निवडणुकीसाठी उगाच प्रचार करून आपण परिस्थिती बदलू शकतो या भ्रमात राहू नका.आपला आत्म सन्मान विकू नका.कारण निवडणुका झाल्यानंतर तुम्हाला कोणीही हिंग लावून विचारणार नाही.(हिंग लावून विचारणं हि एक म्हण झाली.प्रत्यक्षात हिंग महाग असतो)तेंव्हा या वेळी पक्ष नाही तर व्यक्तीला मतदान करा.

या पोस्टवर चाहत्यांच्या देखील प्रतिक्रीया येत आहेत. यात "एक संधी मनसेला द्यायलाच हवी" असं एका चाहत्याने म्हटलं आहे.

ऐरोलीत गणेश नाईक वि. ठाकरेंच्या शिवसेनेचे मनोहर मढवी

PM Modi Speech | 'Rahul Gandhi यांच्या तोंडातून हिंदूहृदयसम्राट वदवून दाखवा', मोदींचा टोला

NEWS PLANET With Vishal Patil |नारा एक, भूमिका अनेक; 'बटेंगे तो कटेंगे'वरून पंकजा मुंडेंचा घरचा आहेर

Rajesaheb Deshmukh Parli Assembly election 2024 : परळीत हाय व्होल्टेज सामना! राजेसाहेब देशमुख विरुद्ध धनंजय मुंडे

Dhananjay Munde Parli Assembly election 2024 : धनंजय मुंडेंसमोर मराठा उमेदवाराचे आव्हान