राजकारण

Vinayak Raut : लोकसभा अध्यक्षांनी पक्षपाती निर्णय घेतला

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : लोकसभा गटनेते पदावर बंडखोर खासदार राहुल शेवाळे (Rahul Shewale) यांच्या नियुक्तीवर शिवसेनेने आक्षेप घेतला आहे. शिवसेना खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी लोकसभा सचिवांनी पक्षपाती निर्णय घेतला असून शिवसेनेवर (Shivsena) अन्याय केला असल्याचा आरोप केला आहे. ते माध्यमांशी संवाद साधत होते.

विनायक राऊत म्हणाले की, आम्ही लोकसभा अध्यक्षांना 18 जुलै रोजी पत्र लिहून आमची बाजू ऐकून घेण्याची विनंती केली होती. तरीही आमची बाजू न ऐकता नव्या गटनेत्याला मान्यता देण्यात आली. हा शिवसेनेवर अन्याय आहे. लोकसभा सचिवांनी पक्षपाती निर्णय घेतला, असा आरोप त्यांनी केला आहे.

शिंदे गटाने बहुमताचा क्लेम 19 जुलैला केला. पण, 18 जुलैपासूनच नियुक्ती करण्यात आल्याचे पत्रात दाखवते आहे. बहुमत दाखवण्यासाठी आम्हाला बोलवण्याची गरज होती. आम्ही तीन पत्र पाठवूनही एकतर्फी निर्णय घेण्यात आला. हे पत्र अध्यक्षांनी वाचलेच नसून हे देशाचे दुर्देव समजायचे. शिंदे गटाने लोकसभेच्या गटनेते पदी दावा करणे अयोग्य आहे. लोकसभा सचिवालयाचे हे कृत्य कोणत्या गोष्टीला धरुन आहे हे अनाकलनीय आहे. या अन्यायाविरोधात सर्वोच्च न्यायलयात दाद मागणार असल्याचेही राऊतांनी सांगितले. तसेच, संख्याबळ असले तरीही गटनेते निवडण्याचा अधिकार फक्त शिवसेना पक्षप्रमुखांनाच आहेत. तर, ही नौटंकी कोणाच्या तालावर सुरु आहे हे माहितीये, असे म्हणत भाजपवर अप्रत्यक्ष निशाणा साधला.

दरम्यान, शिवसेनेच्या 12 खासदारांनी दिल्लीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. शिंदेची भेट घेतलेल्या या खासदारांमध्ये श्रीकांत शिंदे, भावना गवळी, हेमंत गोडसे, राहुल शेवाळे, कृपाल तुमाने, श्रीरंग बारणे यांच्यासह 12 खासदारांचा समावेश आहे. या खासदारांनी गटनेतेपदी राहुल शेवाळेंच्या नियुक्तीचे पत्र लोकसभा अध्यक्षांना दिले. तसेच संसदेतील शिवसेना कार्यालय ताब्यात घेण्याचा हालचाली सुरु केल्या आहे.

Sankashti Chaturthi 2024: पितृपक्षातील संकष्टी चतुर्थीनिमित्त जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि चंद्रोदयाची वेळ

Supreme Court: सर्वात मोठी बातमी! सर्वोच्च न्यायालयाचे YouTube चॅनल हॅक

Ravikant Tupkar: शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी रविकांत तुपकर आक्रमक

Wadigodri: वडीगोद्रीत लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारेंचं उपोषण

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! पुण्यातून दुबई बँकॉकसाठी विमानसेवा होणार सुरू