राजकारण

महाराष्ट्रातील राजकारणांनी चुल्लूभर पाणीमध्ये डूब मरण्याची वेळ आहे; वडेट्टीवारांचा घणाघात

सिंधुदुर्गातील पाणबुडी प्रकल्प आता गुजरातच्या द्वारका येथे होणार आहे. यावरुन विजय वडेट्टीवारांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

नागपूर : सिंधुदुर्गातील पाणबुडी प्रकल्प आता गुजरातच्या द्वारका येथे होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील आणखी एक प्रकल्प गुजरातला गेल्याची चर्चा सुरू झाली आहे. यावरुन विजय वडेट्टीवारांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. महाराष्ट्रातील राजकारणांनी चुल्लूभर पाणीमध्ये डूब मरण्याची वेळ आहे. ती आता खरी होताना दिसून येत आहे, अशा शब्दात वडेट्टीवारांनी टीका केली आहे.

विजय वडेट्टीवार म्हणाले की, महाराष्ट्रातील राजकारणांनी चुल्लूभर पाणीमध्ये डूब मरण्याची वेळ आहे. ती आता खरी होताना दिसून येत आहे. देश म्हणजे फक्त गुजरात नाही. एकेकाळी उद्योगात अग्रस्थानी असलेला महाराष्ट्र गुंतवणूक करणारे प्राधान्य देत होते. आता आपला प्राधान्यक्रम हा महाराष्ट्राचा आठव्या व नवव्या स्थानावर जाऊन पोहोचला आहे.

उद्योग झपाट्याने पळवले जात आहे. जोर-जबरदस्तीने समृद्ध गुजरात करून देश खिळखिळा करण्याचा काम सुरू आहे. फॉक्सकॉन, पाणबुडी सगळे प्रकल्प गुजरातला जात आहे, महाराष्ट्रातील तरुणाचा हातात भिकेचे कटोरे देण्याचं काम सुरू आहे, असा घणाघात त्यांनी केला आहे.

दरम्यान, नववर्षाच्या पुर्वसंध्येला ठाण्यात रेव्ह पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीमध्ये पोलिसांनी धाड टाकून सुमारे 96 तरुणांना ताब्यात घेतले आहे. यावरही विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अंमली पदार्थ ड्रगमुळे राज्य बुडत चाललं आहे. महाराष्ट्रात कायदा सुवस्था बिघडली आहे. गुटखा, तंबाखू विकला जात आहे. रेव्ह पार्टी खुलेआम सुरू आहे. त्याकडे लक्ष नाही. देवेंद्र फडणवीस यांची पकड मुख्यमंत्री असताना जी होती ती पकड उपमुख्यमंत्री झाल्यापासून सुटत चालली आहेत. सर्रास रेव्ह पार्टी सुरू आहे. मुख्यमंत्री यांच्या जिल्हयात ठाण्यात सर्वाधिक रेव्ह पार्टी आहे, असेही त्यांनी म्हंटले आहे.

Lokshahi Marathi Live Update : शरद पवार यांची आज कराडमध्ये पत्रकार परिषद

नव्या मंत्रिमंडळांचा संभाव्य फॉर्म्युला 'LOKशाही मराठी'च्या हाती

महाराष्ट्रातील २८८ मतदारसंघातील पक्षनिहाय विजयी आणि पराभूत उमेदवारांची यादी

Railway Platform Yellow Strip: रेल्वे प्लॅटफॉर्मवर असणाऱ्या पिवळ्या पट्टीचा अर्थ काय माहित आहे? जाणून घ्या...

Lokshahi Marathi Live Update : राष्ट्रवादीच्या आमदारांची 'देवगिरी'वर बैठक सुरु