राजकारण

मुलगी आणि नवजात बाळ गमावले, कुटुंबाने वडेट्टीवारांसमोरच फोडला टाहो

Published by : Shweta Shigvan-Kavankar

नांदेड : नांदेड येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे २४ तासांत २४ जणांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली. या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. या घटनेवरून आता विरोधी पक्षातील नेत्यांकडून सरकारवर टीका केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी नांदेड येथे भेट दिली.

डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात विजय वडेट्टीवार यांनी भेट दिली. यावेळी एका कुटुंबाने आपली मुलगी आणि तिचे नवजात बाळ गमावले, त्या कुटुंबाने वडेट्टीवारांसमोरच टाहो फोडला. याबाबतची माहिती त्यांनी ट्विटरवरुन दिली आहे. खूप चीड येत आहे सत्तेत बसलेल्या निष्ठुर सत्ताधाऱ्यांची. थोडी तरी माणुसकी शिल्लक असेल तर सत्तेची मलाई खाणाऱ्यानी डोळे उघडावे, अशी जोरदार टीका विजय वडेट्टीवारांनी सत्ताधाऱ्यांवर केली आहे.

दरम्यान, नागपूर येथेही नांदेडची पुनरावृत्ती घडली आहे. यावरही विजय वडेट्टीवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. मागील काही दिवसापासून महाराष्ट्राची सकाळ अशा दुःखद बातम्यांनी होत आहे. ठाणे, नांदेड, छत्रपती संभाजीनगर आणि आज नागपूर. आणखी किती जिल्ह्यांच्या बाबतीत अशा दुःखद बातम्या पुढे येतील ही चिंता आहे. ट्रीपल इंजिन सरकारने सर्व शासकीय रुग्णालये- दवाखाने हे अक्षरशः भंगारखाणे करून ठेवले आहे.तिकडे तीनही पक्षाचे नेते रुसवे - फुगवे सोडवण्यासाठी, स्वतःच्या पक्षातील नेत्यांच्या खुर्चीची सोय लावण्यासाठी दिल्ली प्रदक्षिणा करताय, असा निशाणा त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर सोडला आहे.

Navratri 2024: नवरात्रोत्सवात दारापुढे सुंदर असे रांगोळीने पाऊले काढण्यासाठी "या" डिझाईन नक्की फोलो करा

"नाम"चा वर्धापन दिन, नाना पाटेकरांसह शिंदे, फडणवीस आणि दादा एकाच मंचावर

Navratri 2024 Colours: जाणून घ्या, दरवर्षीप्रमाणे यावर्षीच्या नवरात्रीचे नऊ रंग

Pandharpur: अन्न व औषध प्रशासनाच्या नियमानुसार लाडूचा प्रसाद

Varun Sardesai UNCUT|मुंबई विद्यापीठाचा टॉवर मंत्रालयासमोर झुकतोय,सिनेटवरुन वरुण सरदेसाईंचा हल्लाबोल