मराठा समाजाला फसवण्याचे काम सरकारने केलं हे लपून राहिले नाही जुन्या चुका परत करून समाजाला न टिकणारा आरक्षण दिलाय अशी मराठा समाजाची समज झाली आहे किंवा त्यांना कळून चुकल आहे. आमची मराठा समाजाला विनंती आहे की, असे उमेदवार उभे करण्यापेक्षा जो मराठा समाजासाठी आडवा येतोय त्याला आडवा करण्यासाठी निवडणूकीत मतदान करावं, उमेदवार उभे करणे, मनातील राग काढण्यासाठी लोकशाहीसाठी करणे योग्य राहणार नाही असं मला वाटतं असे आवाहन विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केले आहे.
भाजप उमेदवारांच्या यादीत महाराष्ट्रातील नाव नसल्याच्या मुद्द्यावरून विजय वडेट्टीवारांनी शिवसेना, राष्ट्रवादीला डिवचलं आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीला महाराष्ट्रात किती जागा द्यायच्या हे ठरलं नसल्याने राज्यातील उमेदवारांची नावं जाहीर केले नाहीत असं वडेट्टीवारांनी म्हटलंय. दोघांना लोकसभेच्या 4-4 जागा देण्याबाबत फायनल होईल तेव्हा महाराष्ट्रातील यादी जाहीर होतील असा टोला वडेट्टीवारांनी लगावला आहे.
प्रकाश आंबेडकर यांचा वंचित बहुजन आघाडी या पक्षाची अद्याप महाविकास आघाडीशी युती झालेली नाही. आमची चर्चा झाली, दोन दिवसांत तीनही पक्ष प्रकाश आंबेडकर यांच्याशी बोलतील. पाच किंवा सहा तारखेपर्यंत हा तिढा पूर्ण सुटेल दिसेल असं मला वाटतं असे विजय वड्डेटीवार म्हणाले.
लोकांना वेटीस धरून खाजगी गाड्या किरायाने करून मेळावा केला, तर कार्यकर्त्यांना बळ देणार असतो की लोकांना वेटीस धरणारा असतो, याचा मतदानातून कळेल. हा पक्ष्याचा कार्यक्रम आहे एवढा निवडणूकीच बळ त्यांच्याकडे आहे की लाख नाही, दोन लाख आणू शकतील. जेवढ्या गाड्या लावतील तेवढे लोक जास्त येतील पण गाड्या लावून आणि गाडीत बसवून खाण्यापिण्याची सोय करून लोक आलेले ते काही पक्षाबरोबर उभे राहतात असा आमचा अनुभव नाही आहे भाजप युवा मेळावा याबाबत विजय वड्डेटीवार म्हणाले.
संजय गायकवाड यांच्याबाबत विजय वड्डेटीवार म्हणाले की, कारवाई करणं पोलिसाचं काम आहे, सरकार कुणावर कारवाई करते, बेताल वक्तव्य करणाऱ्यावर कारवाई करते का? गुंडाला संरक्षण देणाऱ्या कारवाई करते का? खून करतात, बेताल वक्तव्य करतात, महिलांबद्दल वक्तव्य करतात, माईकवरून ठार करण्याचे वक्तव्य करतात, हे सगळं सत्ता आणि सत्तेतून आलेल्या पैशाची मस्ती आहे. त्यामुळे कारवाईची अपेक्षा करणे कितीही अन्याय झाला तर न्याय मिळेल हे गैरसमज आहे असं मला वाटतं. एकाने कारवाई करायला सुरुवात केली दुसरा फोन करतो, दुसऱ्याने फोन केला की तिसऱ्याचा फोन येतो, तुम्ही कारवाई करा याचा ऐकू की त्याचा ऐकू, कोणाला नाराज करू, यामुळे राज्य पूर्णतः कायदासुव्यवस्था नाही.