राजकारण

इतक्या लवकर भूमिका बदलताना पहिल्यांदा बघतोय; अधिवेशनात वडेट्टीवार-मुंडे आमनेसामने

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : शेतकरी प्रश्नांवरुन पावसाळी अधिवेशन आज गाजले आहे. यावेळी कॉंगेस नेते विजय वडेट्टीवार यांनी जोरदार टोलेबाजी केली. तर, कॉंग्रेस सोडून सर्वपक्षीय सरकार आलं, असा टोला त्यांनी लगावला आहे. तर, पिक विमा योजनेवरून विजय वडेट्टीवार आणि कृषिमंत्री धनंजय मुंडे आमनेसामने आले आहेत.

विजय वडेट्टीवार म्हणाले की, शेतकऱ्याला केंद्रबिंदू मानून पिकविमा ही योजना स्वतःची पाठ थोपटून घेण्यासाठी आणली आहे. 2014 मध्येही हे सरकार होते. आता तर कॉंग्रेस सोडून सर्वपक्षीय सरकार आले आहे. तुम्ही गुलाबरावजी बसल्या बसल्या बोललात सांभाळून राहा कोई अंदर आता है तो कोई बाहर जाता है. वो सोचकर हम तो खुश है आपको भी होना चाहिये हमारे पुराने दोस्त समझकर. बहोत खुशी होगी हमे, असा टोला त्यांनी गुलाबराव पाटलांना लगावला.

शेतकरी कधीही विमा भरण्यासाठी मागे-पुढे पाहत नव्हता. भरावचं किती लागते होते केवळ 200 रुपयं. एक रुपयांने पीकविमा काढणे यामध्ये शेतकऱ्यांचा फायदा नाही. तर राज्य सरकारची तिजोरी लुटून कंपन्यांचा फायदा करण्याचा त्यामागे हेतू आहे, असा आरोप वडेट्टीवार यांनी केला आहे.

यावर धनंजय मुंडे यांनी उत्तर दिले असून ते म्हणाले, विजय वड्डेटीवार अतिशय पोटतिडकीने पीकविम्याबाबत बोलत आहेत. कदाचित त्यांना माहित नसेल प्रत्येक पीकामागे शेतकऱ्यांना विमा भरताना किती भरावे लागते. सोयाबीन, कापूस, धान, आंब्याला वेगवेगळी किंमत आहे. एवढचे सांगायचं आहे की कंपन्याना फायदा होतो हे सत्य नाही. या योजनेचा 80.120 पॅटर्न ठरलेला आहे. हा बीडचा पॅटर्न आहे. 80 टक्के नुकसान द्यावा लागले आणि कंपनीचा फायदा झाला तर तो सरकारकडे जमा करायचा आणि 20 टक्के कंपनीकडे ठेवायचा. तसेच, 120 टक्के नुकसान द्यावे लागले तर ते कंपनीने द्यायचे आहे, असे त्यांनी सांगितले. सभागृहातील सदस्य शेतकऱ्यांच्या पोटी जन्माला आलेले आहेत असे समजून पीकविमा योजनेबाबत सभागृहात संभ्रम निर्माण करु नये, अशी विनंती त्यांनी केली.

यावर विजय वडेट्टीवार यांनी माणसांची भूमिका किती लवकर बदलते. इतक्या लवकर भूमिका बदलताना पहिल्यांदा बघतोय. म्हणजे तुम्हाला मानावे लागेल. पावसाळा संपेपर्यंत तरी थांबायचे, असा निशाणा धनंजय मुंडेंवर साधला आहे. परवा पिकविम्या कंपन्यावर गुन्हा दाखल केले आणि मागे घेतले, अशी माझ्याकडे माहिती आहे. गुन्हा दाखल केला तर मागे का घेतला, असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. 2022-23 चे अतिवृष्टीचे पैसे अद्यापही मिळालेले नाही. कारण सरकार आल्यानंतर खात्यावरुन भांडणे झाली, अशी टीकाही वडेट्टीवारांनी केली.

Baramati | Supriya Sule | बॅनरवर सुप्रिया सुळेंचा 'भावी मुख्यमंत्री' उल्लेख | Marathi News

Ramdas Athawale | 'देशात जातनिहाय जनगणना होणं आवश्यक'; रामदास आठवलेंची मागणी

Narayan Rane | शिवरायांच्या पुतळ्याचे पैसे राणेंसाठी लोकसभेत खर्च? ; नारायण राणेंवर गंभीर आरोप

shirdi saibabatemple | शिर्डीत साईबाबांच्या चरणी हिरेजडीत सुवर्णमुकुट अर्पण | Marathi News

Solapur | भर पावसात मराठा आंदोलकांनी अडवला अजित पवारांचा ताफा, आंदोलकांची जोरदार घोषणाबाजी