राजकारण

Pune Guardian Minister: ...म्हणजे लोक मरू दे, यांना राजकारण महत्वाचे; वडेट्टीवारांचे सरकारवर टीकास्त्र

पुण्याच्या पालकमंत्रीदावरून चंद्रकांत पाटील यांची उचलबांगडी करण्यात आली असून अजित पवार यांच्याकडे पुण्याचं पालकमंत्रीपद देण्यात आलं आहे. यावर नाना पटोलेंनी प्रतिक्रिया दिली आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : पुण्याच्या पालकमंत्रीपदाचा तिढा अखेर सुटला आहे. पुण्याच्या पालकमंत्रीदावरून चंद्रकांत पाटील यांची उचलबांगडी करण्यात आली असून अजित पवार यांच्याकडे पुण्याचं पालकमंत्रीपद देण्यात आलं आहे. यावर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटत आहे. अशातच, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे.

भाजप चाणक्यला आमदार पुरवायला, गोळा करायला फोडायला वेळ मिळतो. पण इथे शासकीय रुग्णालयात आवश्यक यंत्रणा आणि भरती करायला वेळ नाही, असा टोला विजय वडेट्टीवारांनी सरकारला लगावला आहे.

एक उपमुख्यमंत्री आजारी म्हणून घरी बसतात. पालकमंत्री पदासाठी निवडलेला जिल्हा भेटत नाही म्हणून रुसून बसतात. मुख्यमंत्री आणि दुसरे उपमुख्यमंत्री दिल्लीला जातात. म्हणजे लोक मरू दे, यांना राजकारण महत्वाचे, अशी टीकाही त्यांनी केली आहे.

दरम्यान, नांदेड येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे २४ तासांत २४ जणांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली. या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. यापाठोपाठ नागपूरमध्येही नांदेडची पुनरावृत्ती घडली आहे. नागपूरच्या शासकीय मेयो आणि मेडिकल हॉस्पीटलमध्ये मागील 24 तासात 25 रुग्णांचा मृत्यूने राज्याचे लक्ष वेधले आहे.

Shirkant Shinde On Uddhav Thackarey | 'लोकांना काम करणारं सरकार पाहिजे, घरी बसणारं नाही' Vidhansabha

वायनाड पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींचा घवघवीत यश; मोडला राहुल गांधी यांचा रेकॉर्ड

Maharshatra Vidhansabha Result | राज्यात महायुतीला घवघवीत यश; मविआला मात्र मोठा धक्का

Maharashtra Assembly Election Result: भाजप ठरला किंगमेकर! जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Lokshahi Marathi Live Update : वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींचा विजय