लोकसभा सचिवालयकडून काल पक्षांच्या कार्यालयात वाटप झालं, शिंदेंना जे कार्यालय मिळालं शिवसेनी शिंदे असं लिहिलेलं आहे त्यावर त्यांच्यापेक्षा काही खासदारांनी आक्षेप नोंदवला या प्रश्नावर उत्त देताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेऊन आणि बाळासाहेब ठाकरेंचं ओळखीचा वापर करुन आणि बाळासाहेबांचा किमयेचा वापर करुन राज्यभर ते फिरले आणि लोकसभेमध्ये सुद्धा त्यांनी बाळासाहेबांचा फोटो वापरला. आता जर ते शिंदे हे नाव लिहून शिवसेनेची ओळख शिंदेगट असं जर करत असतील तर शिंदे गटाला आणि शिवसेना शिंदे यांना विधानसभेमध्ये यांची ताकद काय आहे, यांची किमया काय आहे, यांची लोकप्रियता काय आहे आणि या नावासा वलई किती आहे हे विधानसभेमध्ये दिसेल जनता यांना दाखवून देईल.
कदाचित जेवढं दुखावता येईल तेवढं जखमेवर मीठ चोळण्याचं काम भाजपकडून सुरु आहे. ती जखम एवढी मोठी झाली पाहिजे मीठ चोळून चोळून ती कधीही न भरणारी जखम तयार झाली की आपोआप तो माणूस दूर करता येतो अशी काही त्यामागचं काही धोरण असावं.
आता भाजपमध्ये हिंदूत्ववादीस आहे तर त्यांच्याकडे त्यांचे प्रवक्ते मुसलमान नाहियेत हा कसला वाद आहे हिंदूत्व हा एक विचार आहे त्याला धर्माशी जोडता कामा नये. हिंदूत्व हा एक अनेक पक्षांचा अजेंडा कुठल्या जातीवर आणि धर्मावर आधारित होऊ शकत नाही. या देशामध्ये लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये हिंदू , मुस्लिम, दलीत असा भेदभाव करता येणार नाही. तुम्हाला मत मागताना तुम्ही जर या अजेंडावर जाणार तर तुम्हाला निवडणूक लढण्याचा अधिकार देखील तुम्ही गमावून बसणार आहोत. त्यामुळे शिवसेनेने जर मुस्लिम उमेदवार देण्याची तयारी असेल तर मला काही त्यात वावगं वाटत नाही ते लोकशाहीला म्हणतात, ते संविधानाला म्हणातात असा त्याचा अर्थ होतो असे विजय वडेट्टीवार म्हणाले.
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यामध्ये दीड तास चर्चा झाली आणि ती जागावाटपाच्या बाबतीत होती अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यात आणि फडणवीस गैरहजर होते या प्रश्नावर उत्तर देताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, त्यांचे बॅनर फाडले जात आहेत, त्यांच्या बॅनरवर काळा पडदा टाकला जात आहे आणि तेही खुद्द बारामतीमध्ये काल त्यांची संयुक्त प्रेस झाली त्यामध्ये अजित पवारांनी एकदाही मुख्यमंत्र्यांकडे बघितले नाही. सगळ्यांचे चेहरे पूर्णतः पडलेले होते. त्या चेहऱ्यावर तेज नव्हता. सत्तेच्या खूर्चीवर बसणाऱ्यांच्या चेहऱ्यावर तेज दिसतो, चेहरे पडलेले आहेत, परतीचा प्रवास सुरु झाला आहे. या प्रवासामध्ये अधिकाधिक काय लोड होईल यासाठी हा सगळा वाद सुरु आहे. श्रेय वाद कोणी कितीही काही म्हणूदे पण श्रेय वादाची लढाई आणि सत्तेच्या लढाईमध्ये कमजोर, कमकूवत दुवा जो असतो त्याला बाजूला सारण्याचा प्रयत्न आहे. आता सुरु झाला आहे कदाचित त्यामध्ये पहिला नंबर हा अजित पवारांचा असेल आणि दुसरा नंबर त्यानंतर एकनाथ शिंदेंचाही असेल.