राजकारण

'त्या' आक्षेपार्ह व्हिडिओवर विद्या चव्हाणांची प्रतिक्रिया; सोमय्या चिखलामध्ये लोळतायंत

राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी प्रतिक्रिया देत किरीट सोमय्यांवर कारवाई करण्याची मागणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : भाजपचे वरिष्ठ नेते किरीट सोमय्या यांचा आक्षेपार्ह व्हिडीओ समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. यावरुन आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी प्रतिक्रिया देत किरीट सोमय्यांवर कारवाई करण्याची मागणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

किरीट सोमय्यांच्या व्हिडीओमुळे मला धक्का बसला आहे. दुसऱ्यांवर चिखल आणि शिंतोंडे उडविणारे सोमय्या स्वतः चिखलामध्ये लोळत आहे. त्यांचे अनैतिक व्यवहार आणि संबंध बाहेर असतीर तर दुसऱ्यावर बोलण्याचा काय अधिकार आहे, असा सवाल विद्या चव्हाण यांनी उपस्थित केला आहे.

केवळ विरोधकांवर चिखलफेक करायची तुमच्या पक्षात आले तर भ्रष्ट्राचार मुद्दे गाडून टाकायचं हे प्रकार किरीट सोमय्यांनी केले आहेत आणि अशाप्रकारे महिलांसोबत अश्लील प्रकार करत असतील त्यांना दुसऱ्यांवर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. या माणसांचा खरा चेहरा लोकांसमोर आला आहे, असेही त्यांनी म्हंटले आहे.

प्रत्येक वेळेस कोणतेही गंभीर प्रकरण अंगलट आले तर बायकोला पुढे करण्याचे काम सोमय्या करतात आणि स्वतः भ्रष्टाचारात कुठेही नाही असं दाखवतात. स्वतः असले प्रकार करत असतील तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई गृहमंत्र्यांनी केली पाहिजे. याची चौकशी झाली पाहिजे. तसेच, सोमय्यांविरोधात महिला आंदोलनही करु. अशाप्रकारे घाणरडे प्रकार करणाऱ्या माणसाला राजकारणात राहण्याचा अधिकार नाही. भाजपने सोमय्यांची ताबडतोब हकालपट्टी केली पाहिजे, असेही विद्या चव्हाण यांनी म्हंटले आहे.

Lokshahi Marathi Live Update : रणजितसिंह मोहिते पाटील यांची पक्षातून हकालपट्टी करा- राम सातपुते

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार ? | Marathi news

Shirkant Shinde On Uddhav Thackarey | 'लोकांना काम करणारं सरकार पाहिजे, घरी बसणारं नाही' Vidhansabha

वायनाड पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींचा घवघवीत यश; मोडला राहुल गांधी यांचा रेकॉर्ड

Maharshatra Vidhansabha Result | राज्यात महायुतीला घवघवीत यश; मविआला मात्र मोठा धक्का