राजकारण

राष्ट्रवादीत खरंच दोन गट पडले? विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचे मोठं विधान म्हणाले...

राज्यात एकापाठोपाठ एक राजकीय घडामोडी घडत आहेत.

Published by : Siddhi Naringrekar

राज्यात एकापाठोपाठ एक राजकीय घडामोडी घडत आहेत. शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादीत बंडखोरी झाली आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बंड करत युती सरकारमध्ये सामिल होत उपमुख्यमंत्रीपदाची रविवारी शपथ घेतली. त्यांच्यासोबत काही आमदारांनी देखील मंत्रिपदाची शपथ घेतली. याता राष्ट्रवादीत दोन गट पडले आहेत.

याच पार्श्वभूमीवर आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी एक विधान केल्याने चर्चांना उधाण आलं आहे. एका माध्यमाशी बोलताना राहुल नार्वेकर म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयात आणि उच्च न्यायालयात याचिका दाखल करणे प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे. त्यावर मी कुठलीही बाधा आणू शकत नाही. काही आमदार आणि राजकीय पक्षांनी निवेदन दिली आहेत. त्यात एकापेक्षा अधिक नेत्यांनी पक्षाचं नेतृत्व केल्याचा दावा केला आहे. मला आता खात्री करून घ्यावी लागेल की, नेमका कोण नेता पक्षाचे नेतृत्व करत आहे. हा निर्णय घेतल्यानंतर मला पुढचे निर्णय घेणे सोपे होईल,

तसेच अर्धा पक्ष इकडे आणि अर्धा पक्ष तिकडे अशी परिस्थिती आपल्याला उद्भवलेली दिसणार नाही. माझ्याकडे गेल्या दोन दिवसांत अनेक निवेदन आली आहेत. कुठल्याही गटाने किंवा आमदाराने राष्ट्रवादीत फूट पडल्याचं निवेदन मला दिलेलं नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून एकच विधीमंडळ पक्ष आहे. त्यामुळे जो निर्णय होईल तो याच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी होईल. कार्यकारी मंडळ, विधीमंडळ, कायदेमंडळ या तिन्ही संस्था स्वतंत्रपणे काम करत असतात. संविधानातील तरतुदीनुसार विधानसभा अध्यक्षांच्या कामात आणि कामाच्या पद्धतीत कुठलीही संस्था ढवळाढवळ करणार नाही. विधिमंडळ सचिवालयाकडे आलेली निवेदने आणि याचिकांचा अभ्यास केला जात आहे. त्याचं नोटींग तयार करून माझ्यासमोर सादर केल्यानंतर योग्य तो निर्णय घेतला जाईल. असे नार्वेकर म्हणाले.

शिवसेना ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर

शिवसेना ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर

Diwali Rangoli Design: दिवाळीच्या प्रत्येक दिवसासाठी खास रांगोळी डिझाईन्स, पाहा आणि दाराबाहेर सजवा

एकता कपूर, शोभा कपूरला पोलिसांकडून नोटीस, ‘अल्ट बालाजी’वरील वेबसिरीज ठरलं कारण...

Aditi Tatkare | राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर, आदिती तटकरे यांची पहिली प्रतिक्रिया