विधानपरिषद निवडणुकीसाठी (VidhanParishad Election)शिवसेनेने नव्या दमाच्या शिलेदारांना संधी दिलीआहे. त्यामुळे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई (Subhash Desai) यांना पुन्हा विधानपरिषदेत जाण्याची संधी मिळणार नाही. त्यांचे मंत्रीपदही धोक्यात आले आहे. सुभाष देसाई (Subhash Desai) औरंगाबादमध्ये आले आहेत. यावेळी प्रसारमाध्यमांनी त्यांना यासंदर्भात प्रश्न केला.
माध्यमांशी बोलतांना सुभाष देसाई म्हणाले, विधान परिषदेसाठी शिवसेनेच्या वाट्याला दोन जागा आल्या आहेत. आपण यंदा विधानपरिषद निवडणूक लढणार नाही. या दोन्ही जागेवर नव्या उमेदवारांना संधी देण्यात येणार आहे. यामुळे मी विधान परिषदेसाठी उमेदवार नाही. मी पक्षावर नाराज असण्याचा किंवा माघार घेण्याचा प्रश्नच येत नाही. विधानपरिषदेचे उमेदवार निवडण्याच्या समितीत मी आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करूनच मी विधानपरिषद निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळेच नव्या उमेदवारांना संधी देण्यात आली.
सहा महिन्यांत निवड हवीच
सुभाष देसाई हे उद्योग मंत्री आहे. त्यांना मंत्रीपद कायम ठेवण्यासाठी सहा महिन्यांत एखाद्या सभागृहाचे सदस्य होणे गरजेचे आहे. विधान सभा किंवा विधान परिषदेचे सदस्य होणे गरजेचे होते.