Uma Khapare | Vidhan Parishad team lokshahi
राजकारण

भाजपाने करुन दाखवलं, उमा खापरेंसह पाचही उमेदवार विजयी

भाजपचे पाचही उमेदवार विजयी, फडणवीसांचा महाविकास आघाडीला पुन्हा चेकमेट

Published by : Shubham Tate

Vidhan Parishad Election : राज्यात आज विधान परिषदेची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत सर्वच पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागल्याचे पहायला मिळाले. राज्यसभेच्या फटक्यानंतर महाविकास आघाडी सावध झाल्याचे दिसून आले होते. मागच्या विजयामुळे भाजपाचा आत्मविश्वास वाढलेला पहायला मिळत होता. तो भाजपा नेत्यांनी अनेकदा बोलून ही दाखवला त्यामुळे ही निवडणूक चुरशीची पहायला मिळाली. राज्यसभेतील चुका लक्षात घेत सर्व आमदारांनी योग्य ती खबरदारी घेत मतदान केले. आणि सर्व आमदारांची मतं वैध ठरली आहेत. मात्र काँग्रेसने आक्षेप घेतलेली भाजपची दोन्ही मतेही वैध ठरली आहेत. (vidhan parishad election maha mlc election 2022)

विधान परिषदेसाठी भाजपा कडून - श्रीकांत भारतीय, उमा खापरे, प्रसाद लाड, राम शिंदे, प्रवीण दरेकर मैदानात होते.

शिवसेनेकडून - सचिन अहिर, आमश्या पाडवी मैदानात होते.

राष्ट्रवादी - रामराजे नाईक निंबाळकर, एकनाथ खडसे मैदानात होते. एकनाथ खडसेंच्या उमेदवारीमुळे या निवडणुकीत आणखी रंगत आली होती.

तर काँग्रेस कडून चंद्रकांत हंडोरे, भाई जगताप मैदानात होते.

भाजपचे पाचही उमेदवार विजयी झाले आहेत. फडणवीसांचा महाविकास आघाडीला पुन्हा चेकमेट दिला आहे. तर काँग्रेसच्या भाई जगताप यांचा दारूण पराभव झाला आहे. प्रसाद लाड यांचा पुन्हा एकदा दणदणीत विजय झाला आहे. काँग्रेसचा दुसरा उमेदवार पराभूत झालेला आहे.

कोण किती मतांनी विजयी झालं?

राष्ट्रवादी काँग्रेस एकनाथ खडसे -विजयी-27७ रामराजे नाईाक निंबाळकर -विजयी- 26

भाजपा प्रवीण दरेकर - विजयी- 26 राम शिंदे - विजयी- 26 श्रीकांत भारतीय- विजयी- 26 उमा खापरे - विजयी 26

काँग्रेस भाई जगताप - विजयी

शिवसेना आमशा पाडवी - विजयी -26 मते सचिन अहिर- विजयी - 26 मते

काँग्रेसच्या तक्रारीनंतर मतमोजणी लांबली

भाजप आमदार लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांच्या मतदानावर काँग्रेसनं आक्षेप घेतला होता. काँग्रेसनं घेतलेला आक्षेप राज्य निवडणूक आयोगानं फेटाळला. त्यानंतर प्रकरण केंद्रीय निवडणूक आयोगाकडं गेलं. केंद्रीय निवडणूक आयोगानं देखील काँग्रेसचा आक्षेप फेटाळल्यानंतर मतमोजणीला सुरुवात झाली.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी