Devendra Fadnavis | Sanjay Raut Team Lokshahi
राजकारण

संजय राऊतांना शेअर केला मराठा क्रांती मोर्चाचा व्हिडिओ? फडणवीसांनी मारला टोमणा

राऊतांनी मराठा क्रांती मोर्चाचा व्हिडीओ ट्वीट केल्याचा दावा भाजप आणि मराठा क्रांती मोर्चाकडून केला जात आहे.

Published by : Sagar Pradhan

काल महाविकास आघाडीच्या महामोर्चा पार पडला. त्यानंतर राज्यात राजकीय वर्तुळात एकच आरोप-प्रत्यारोप सुरु आहे. त्यातच कालच्या महामोर्चावरुन रंगलेल्या राजकारणानंतर फडणवीसांनी हा मोर्चा नॅनो मोर्चा असल्याचं म्हटले होते. त्यानंतर एकच उत्तर मविआकडून देण्यात येत होते. त्यावरच शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज एक व्हिडीओ ट्वीट केल्यानंतर राजकारण चांगलंच तापलं आहे. राऊतांनी मराठा क्रांती मोर्चाचा व्हिडीओ ट्वीट केल्याचा दावा भाजप आणि मराठा क्रांती मोर्चाकडून केला जात आहे. त्यावरच आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

राऊतांच्या ट्विटरवर फडणवीसांचे उत्तर?

संजय राऊतांनी एक व्हिडीओ ट्वीट केला. मी त्या मोर्चाला नॅनो मोर्चा म्हटलं होतं. आज जो त्यांनी व्हिडीओ ट्वीट केला तो मराठा मोर्चाचा व्हिडीओ आहे, अशी मला माहिती मिळाली आहे. मला याबाबत काही कल्पना नाही पण असं होऊ शकतं. कारण मोठा मोर्चा नव्हता, त्यामुळं व्हिडीओ आणायचा असेल तर तो दुसऱ्या मोर्चाचाच आणावा लागेल, असा टोला फडणवीस यांनी लगावला आहे.

काय होते राऊत यांच्या ट्विटमध्ये?

देवेंद्र फडणवीस ज्यास नॅनो मोर्चा म्हणून हिणवत आहेत तो हाच! महाराष्ट्र प्रेमी जनतेचा बुलंद आवाज. देवेंद्र जी. हे वागणे बरे नाही.जय महाराष्ट्र! असं राऊतांनी व्हिडीओ ट्वीट करत म्हटलं आहे. या व्हिडीओवरुन टीका होऊ लागल्यानंतर राऊतांनी पुन्हा एक ट्वीट करत म्हटलं आहे की, मराठा मोर्चा देखील महाराष्ट्र स्वाभिमान, न्याय्य हक्कांसाठी निघाला.शिवरायांचा जयघोष करीत त्याच मार्गावरून त्याच ताकतीने निघाला.तेव्हा देखील आजच्याप्रमाणे विराट मोर्चाची चेष्टा दबक्या आवाजात हेच लोक करत होते.दोन्ही मोर्चे महाराष्ट्राचा स्वाभिमान दाखवणारे होते. तूर्त इतकेच! असं राऊतांनी दुसरं ट्वीट करत म्हटलं.

IPL Mega Auction 2025 Live: आयपीएल 2025 लिलावाचे थेट अपडेट्स

वयाच्या २५ व्या वर्षी आमदार झालेले रोहित पाटील यांची पहिली प्रतिक्रिया समोर

Lokshahi Marathi Live Update : शरद पवार यांची आज कराडमध्ये पत्रकार परिषद

नव्या मंत्रिमंडळांचा संभाव्य फॉर्म्युला 'LOKशाही मराठी'च्या हाती

महाराष्ट्रातील २८८ मतदारसंघातील पक्षनिहाय विजयी आणि पराभूत उमेदवारांची यादी