राज्यात सध्या राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे. त्यातच नुकताच शिवसेना ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडी यांची युती जाहीर झाली. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच गदारोळ निर्माण झाला आहे. हे सर्व सुरु असताना आज युतीनंतर पहिल्यांदाच वंचित अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची पुण्यात जाहीर सभा झाला. ते या सभेत काय बोलणार याकडे लागले होते. तेव्हा याच सभेत बोलत असताना प्रकाश आंबेडकरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर जोरदार टीका केली आहे.
काय म्हणाले प्रकाश आंबेडकर?
पुण्यात जाहीर सभेत बोलत असताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, 2024 मध्ये गैरभाजप आणि आरएसएसचे सरकार सत्तेत आलं तर नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना तुरुंगात टाकल्याशिवाय राहणार नाही. झुकानेवाला चाहिये, सरकार उसके सामने झुकती है. 2024 मध्ये यांना झुकावं लागेल, हेच आव्हान मी देतोय. असे आव्हान त्यांनी यावेळी दिले आहे.
पुढे ते म्हणाले की, ईडी, सीबीआय, आयबीचा धाक आहे म्हणून सगळे लोकं मुजरा करतात. पण मनातल्या मनात हे कधी जातात हे असं चालले आहे. भाजपवाले म्हणतात की आम्ही 2024 मध्ये परत येऊ. मी म्हणतो 29 मध्ये याल. कारण आम्हा सगळ्यांना आत टाकले जाईल. मग विरोध करणार कोण? तुम्ही त्यांना दोनदा पंतप्रधान केलं. मोदी यांच्या मनामध्ये भीती आहे की 2024 मधील चारित्र्य समोर येऊ नये म्हणून बीबीसीचे माहितीपट दाखवणाऱ्यांना अटक केली जात आहे. मोदी यांना भीती आहे की आपली सत्ता जाईल. म्हणून ती फिल्म बॅन केली. असे देखील बोलत असताना ते म्हणाले.