राजकारण

Vasant More: वसंत मोरे यांचा मनसेला जय महाराष्ट्र; साहेब, मला माफ करा म्हणत दिला राजीनामा

Published by : Dhanshree Shintre

मनसेचे वसंत मोरे यांनी राजीनामा दिला आहे. सकाळी नाराजीची फेसबुक पोस्ट आणि दुपारी राजीनामा दिला. अखेरचा जय महाराष्ट्र , साहेब मला माफ करा अशी पोस्ट करत मोरे यांनी राजीनामा दिला आहे.

वसंत मोरे यांनी राजीनामा देताना ट्विट करत म्हणाले की, पक्षाच्या स्थापनेपासून (किंबहुना त्याही आधीपासून) पक्षाचा सदस्य आणि इतर पदांवर काम करत असताना आपण दिलेल्या जबाबदाऱ्या आणि आदेश यांचे पालन करण्याचा मी माझ्या परीने प्रयत्न करत आलो आहे. पक्ष संघटना वाढीसाठी गेली 18 वर्ष सातत्याने काम करत असताना पुणे शहरात आणि सरचिटणीस म्हणून महाराष्ट्रात कार्यरत राहिलो. परंतु अलीकडच्या काळात पुणे शहरातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून माझ्या विरोधात होत असलेले पक्षांतर्गत गलिच्छ राजकारण व पक्षाप्रति असलेल्या माझ्या निष्ठेवर उपस्थित होत असलेले प्रश्नचिन्ह माझ्यासाठी अत्यंत वेदनादायी आहे. भविष्यात पक्षाचे लोकप्रतिनिधी निवडून यावेत यासाठी मी स्थानिक पदाधिकाऱ्यांना सामावून घेऊन मदत व उपक्रम देतो, त्यांना ताकद देतो त्या सहका-यांची शहरातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून 'कोडी' करण्याचे 'तंत्र' अवलंबिले जात आहे. म्हणून मी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्राथमिक सदस्यत्वासह सर्व पदांचा राजीनामा देत आहे. कृपया आपण तो स्वीकारावा ही नम्र विनंती असे म्हणाले.

Baramati | Supriya Sule | बॅनरवर सुप्रिया सुळेंचा 'भावी मुख्यमंत्री' उल्लेख | Marathi News

Ramdas Athawale | 'देशात जातनिहाय जनगणना होणं आवश्यक'; रामदास आठवलेंची मागणी

Narayan Rane | शिवरायांच्या पुतळ्याचे पैसे राणेंसाठी लोकसभेत खर्च? ; नारायण राणेंवर गंभीर आरोप

shirdi saibabatemple | शिर्डीत साईबाबांच्या चरणी हिरेजडीत सुवर्णमुकुट अर्पण | Marathi News

Solapur | भर पावसात मराठा आंदोलकांनी अडवला अजित पवारांचा ताफा, आंदोलकांची जोरदार घोषणाबाजी