मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी भाजपासोबत मिळून सरकार स्थापन केल्यानंतर शिवसेनेला धक्क्यावर धक्के देत आहेत. त्यातच आता शिंदे गटाने शिवसेनेला (shivsena) आणखी एक मोठा धक्का दिला आहे. वरुण सरदेसाईंची (varun sardesai) युवासेना राज्य सचिवपदावरुन हकालपट्टी करण्यात आली आहे. वरुण सरदेसाई यांच्या हकालपट्टीनंतर शिंदे गटाकडून किरण साळी (kiran salvi) यांची युवासेनेच्या राज्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
दरम्यान शिवसेनेचे अनेक आमदार, खासदार आणि पदाधिकारी शिंदे गटात सहभागी झाले आहेत. ठाणे, नवी मुंबई आणि कोकणातील पदाधिकारी मोठ्या संख्येनं शिंद गटात सहभागी झाले आहेत. दुसरीकडे शिंदे गट आमिष आणि दबाव टाकून शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना आपल्या गटात समील होण्यासाठी दबाव टाकत असल्याचा आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे.
तर दुसरीकडे वरुण सरदेसाई यांच्या हकालपट्टीनंतर शिंदे गटाकडून किरण साळी यांची युवासेनेच्या राज्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. वरुण सरदेसाई आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानण्यात येत आहे.