मणिपूरमध्ये दोन आदिवासी महिलांची विवस्त्र धिंड काढण्यात आली आणि त्यांच्यावर सामूहिक अत्याचार केला असल्याची घटना समोर आली आहे. ही घटना 4 मे रोजी घडल्याची माहिती मिळत आहे. या घटनेने संपूर्ण देश हादरला आहे.
याच पार्श्वभूमीवर वर्षा गायकवाड म्हणाल्या की, मणिपूरमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली. त्या ठिकाणी दोन महिलांची नग्न धिंड काढण्यात आली. आम्ही आज विधिमंडळात या विषयावर बोलण्याच्या प्रयत्न केला. त्या ठिकाणी त्या महिलांना संरक्षण मिळालं पाहिजे. मणिपूर सरकारचा धिक्कार झाला पाहिजे. हा ठराव या ठिकाणी मांडला गेला पाहिजे.
आम्ही विधानसभेच्या अध्यक्षांना आम्हाला या विषयावर बोलायला द्या अशी विनंती केली. मात्र त्या ठिकाणी आम्हाला 5 मिनिटं देखिल बोलायची संधी दिली नाही. या विधिमंडळातसुद्धा महिलांना बोलू दिलं नाही.