अमोल धर्माधिकारी, पुणे; विधानसभेसाठी मतदानाचा दिवस जवळ आला, तरी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत इनकमिंग सुरुच आहे. आता पुण्यातील भाजप आणि राष्ट्रवादीच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने पवारांची ताकद वाढलीय.
पुण्यातील बहूचर्चित वडगाव शेरी मतदार संघातील माजी नगरसेविका रेखा टिंगरेंनी ऐन निवडणूकीच्या धामधुमित अजित पवारांची साथ सोडत शरद पवारांच्या पक्षात प्रवेश केला. रेखा टिंगरेंच्या पक्षप्रवेशाने वडगाव शेरीचे उमेदवार बापू पठारेंची ताकद वाढलीय, तर दुसरीकडे अजित पावारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील टिंगरेंना मोठा धक्का बसलाय.
तीन वेळा नगरसेविका राहिलेल्या रेखा टिंगरे यांनी आज प्रवेश केला. मला आज त्यांनी पाठिंबा दिलाय त्या टिंगरे असल्यातरी तरी आम्ही नातेवाईक आहोत अशी प्रतिक्रिया त्यानी दिलीय. तसेच आगामी काळात अनेकांना प्रवेश करायचाय, काहींच्या अडचणी आहेत.असं सूचक विधान बापू पठारे यांनी केल आहे.
रेखा टिंगरे यांच्या पक्ष प्रवेशामुळे अजित पवार यांचे उमेदवार सुनील टिंगरे यांच्यासमोरील आव्हान वाढले आहे. मतदानाला पाच दिवस बाकी असताना शरद पवार आणखीन कोणकोणते डाव टाकणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. कोणत्याही परिस्थितीत वडगांव शेरीत तुतारी वाजवण्याची रणनीती शरद पवारांनी आखल्याच पाहायला मिळत आहे.