राजकारण

Uddhav Thackeray Interview : शिवसेनेचा मुख्यमंत्री पुन्हा होणार का?; उध्दव ठाकरेंनी सांगितले...

राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज सामनामधील मुलाखतीच्या दुसऱ्या भागात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

Published by : Shweta Chavan-Zagade

राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज सामनामधील मुलाखतीच्या दुसऱ्या भागात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे. उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेत्यांकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि त्यांच्या गटातील आमदार, भाजपवर जोरदार टीका करण्यात येतेय. याच मुद्द्यावरुन मुलाखतीत संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांना पुन्हा शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल का? असा सवाल केला. त्यावर उद्धव ठाकरे यांनीही का नाही होणार, तो जर करायचा नसेल तर माझ्या लढायला काय अर्थ आहे, असं सांगत आपला इरादा स्पष्ट केला.

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह 40 आमदारांच्या अभूतपूर्व बंडाने महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार (Maha Vikas Aghadi) अल्पमतात आलं. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि सरकार कोसळलं. यानंतर एकनाथ शिंदे गटाने भाजपच्या पाठिंब्यावर सरकार स्थापन केलं.

शिवसेनेचा मुख्यमंत्री परत होईल?

शिवसेनेचा मुख्यमंत्री परत होईल? असा सवाल ठाकरे यांना संजय राऊतांनी विचारला असता ते म्हणाले की, का नाही होणार? आणि तो जर करायचा नसेल तर माझ्या लढाईला काय अर्थ आहे. माझं जे शिवसेनाप्रमुखांना वचन आहे ते आजही कायम आहे. मी तर शिवसेनेचाच आहे. मी पक्षप्रमुख आहे. पण माझा हेतू तो नव्हता. मी मुख्यमंत्री होणार असे मी बोललो नव्हतो आणि वचन पूर्ण केल्यानंतरसुद्धा मी काय दुकान बंद करून बसेन? शिवसेना मला वाढवायची आहे आणि ती जर का वाढवण्याचा प्रयत्न मी सोडणार असेन तर मी कशाला पक्षप्रमुख? असंही ते म्हणाले.

उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे की, ज्यांना मी आपले मानले , तीच माणसं सोडून गेली . म्हणजेच ती माणसं कधीच आपली नव्हती . त्यांच्याबद्दल वाईट वाटण्याचे कारण नाही.भाजपात आज बाहेरून आलेल्यांनाच सर्वकाही दिलं जातंय. महाविकास आघाडीचा प्रयोग चुकला नाही . लोकांनी स्वागतच केले . ' वर्षा ' सोडून जाताना महाराष्ट्रात अनेकांनी अश्रू ढाळले . कोणत्या मुख्यमंत्र्यांना असे प्रेम मिळाले ? त्या अश्रूंचे मोल मी वाया जाऊ देणार नाही !'' असं ठाकरे यांनी म्हटलं आहे.

Special Report | Eknath Khadse | CM Eknath Shinde | शिंदेंच्या टार्गेटवर खडसेंचा बालेकिल्ला

Aaditya Thackeray | आदित्य ठाकरेंसाठी यंदा वरळी कठीण? Vidhan Sabha

मनसेच्या अमित ठाकरेंकडून उद्या मेळाव्याचं आयोजन, प्रचाराचं रणशिंग फुंकणार

Mns Candidate List: मनसेची तिसरी यादी जाहीर, 13 उमेदवारांची घोषणा

MVA Seat Formula ; विधानसभेसाठी महाविकास आघाडीचा फॉर्म्युला जाहीर! हा असेल फॉर्म्युला