राजकारण

पुनर्वसन होईपर्यंत तुमच्यासोबत राहू; उद्धव ठाकरेंनी दिला दुर्घटनाग्रस्तांना दिलासा

रायगडमध्ये खालापूर तालुक्यातील इर्शाळगड येथील वाडीवर दरड कोसळली.

Published by : Siddhi Naringrekar

रायगडमध्ये खालापूर तालुक्यातील इर्शाळगड येथील वाडीवर दरड कोसळली. मृतांचा आकडा 25 वर पोहोचला आहे.पाऊस, सर्वत्र झालेला चिखल व तसेच मातीच्या ढिगाऱ्यांमुळे शोधकार्यात अनेक अडचणी येत आहेत. दरडप्रवण क्षेत्रातील नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करून त्यांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधानसभेत दिली. बचाव कार्यात 98 व्यक्तींना वाचविण्यात यश आले आहे.

याच पार्श्वभूमीवर आता रायगड जिल्ह्यातील खालापूर येथील इर्शाळवाडी गावात उद्धव ठाकरे यांनी भेट दिली आहे. इर्शाळगड दुर्घटनेतील पीडितांशी ते संवाद साधत होते. उद्धव ठाकरे म्हणाले की, राजकारण्यासाठी ही लाजीरवाणी गोष्ट आहे. आजही अनेक वस्त्या आहेत. तुम्हाला पुन्हा संकटाचा सामना करावा लागू नये याची खबरदारी घेऊ.

तसेच मी तोंड दाखवायला आलो नाही. तुमचं व्यवस्थित पुनर्वसन होईपर्यंत मी तुमच्यासोबत राहीन. आसपासच्या वस्त्यांशीही संपर्क करू. तुमच्या सर्वांचं पुनर्वसन एका व्यवस्थित जागी करू.दरवेळी अशा दुर्घटना घडत असतात. आपण फक्त धावतो. मी यात राजकारण करत नाही. असे उद्धव ठाकरे म्हणाले.

यावेळी उद्धव ठाकरेंसोबत खासदार राजन विचारे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, अनिल परब आणि सुनील प्रभू आदी उपस्थित होते.

Shivsena: शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड

Lokshahi Marathi Live Update : शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड

निकालातून बोध घेऊन नक्कीच आत्मपरीक्षण करू: सुप्रिया सुळे

IPL Mega Auction 2025 Live: महायुतीकडून सरकार स्थापन करण्यात विलंब होणार?

Oath Ceremony | 26 तारखेपूर्वी शपथविधी होणे बंधनकारक नाही; विधिमंडळातील विश्वसनीय सूत्रांची माहिती