राजकारण

अजित पवारांच्या शपथविधीवर उध्दव ठाकरेंची एका वाक्यात प्रतिक्रिया; म्हणाले, नांदा...

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : अजित पवार यांच्यासह काही आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला आहे. अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. अजित पवारांना 40 आमदारांचा पाठिंबा असल्याचे समोर येत आहे. यावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. अशात, उध्दव ठाकरे यांनी एका ओळीत सूचक प्रतिक्रिया दिली आहे. उध्दव ठाकरे यांनी नांदा सौख्य भरे, असे व्हॉटसअप स्टेटस ठेवत राजकीय घडामोडींवर निशाणा साधला आहे.

दरम्यान, अजित पवारांच्या शपथविधीनंतर संजय राऊतांनीही प्रतिक्रिया दिली होती. महाराष्ट्राच्या राजकारणाचे साफ मातेरे करण्याचां विडा काही लोकांनी उचलला आहे. त्यांना त्यांच्या मार्गाने जाऊ द्या. जनता हे खेळ फार काळ सहन करणार नाही. तसेच, भाजपा ज्यांना तुरुंगात पाठवायला निघाले होते. त्यांनाच मंत्री पदाची शपथ देत आहे, अशी टीकाही संजय राऊतांनी केली आहे.

कोण आहेत विजया रहाटकर? ज्यांना राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी करण्यात आले नियुक्त

Laxman Hake on NCP Sharad Pawar: OBC समाज तुतारीला मतदान करणार नाही, लक्ष्मण हाके यांची घोषणा

Vidhansabha Election Amit thackeray Uddhav thackeray: शिंदे गटाला आता तगडा आवाहन! अमित ठाकरेंना उद्धव ठाकरेंचा पाठिंबा?

ऐन निवडणुकीच्या तोंडावर अजितदादांना धक्का! राजेंद्र शिंगणे शरद पवारांच्या पक्षात पक्षप्रवेश

Attack On Netanyahu's House | इस्राइलचे पंतप्रधान नेतान्याहू यांच्या घरावर हमासकडून हल्ला