राजकारण

दसरा मेळाव्यानंतर उध्दव ठाकरेंनी कसली कंबर; शुक्रवारी रायगड दौऱ्यावर

दसरा मेळाव्यात सत्ता आणणार म्हणजे आणणारच, असा निर्धार उध्दव ठाकरे यांनी केला होता. यानतंर उध्दव ठाकरे अ‍ॅक्टीव्ह झाले असून निवडणुकांसाठी आता कंबर कसली आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : दसरा मेळाव्यात सत्ता आणणार म्हणजे आणणारच, असा निर्धार उध्दव ठाकरे यांनी केला होता. यानतंर उध्दव ठाकरे अ‍ॅक्टीव्ह झाले असून निवडणुकांसाठी आता कंबर कसली आहे. उध्दव ठाकरे 26 ऑक्टोबर म्हणजेच उद्या रायगड दौऱ्यावर असणार आहे.

उद्धव ठाकरे उद्या रायगड दौऱ्यावर असणार आहे. यादरम्यान श्रीवर्धन येथे रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या स्थलांतरीत शाखेच्या उद्घाटन सोहळ्याला उपस्थिती लावणार आहेत. उद्या दुपारी तीन वाजता हा कार्यक्रम पार पडणार आहे. परंतु, रायगड जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीचे बिगुल वाजले आहेत. यामुळे उध्दव ठाकरे यांच्या दौऱ्याला महत्व प्राप्त झाले असून सर्वांचेच याकडे लक्ष असणार आहे.

दरम्यान, दसरा मेळाव्यातून उध्दव ठाकरेंनी शिंदे-फडणवीसांवर जोरदार टीका केली होती. ज्याप्रमाणे हनुमानाने सोन्याची लंका दहन केली. तशीच तुमची खोक्याची लंका दहन करणारा धगधगता निखारा माझ्याकडे आहे, असे उध्दव ठाकरे यांनी म्हंटले होते.

Lokshahi Marathi Live Update : शिवसेनेची आज हॉटेल ताजलँडमध्ये बैठक

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार? | Marathi news

आष्टी/बीड: निवडून येताच भाजपाचे नवनिर्वाचित आमदार सुरेश धस यांची पंकजा मुंडेंवर सडकून टीका

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार ? | Marathi news

Shirkant Shinde On Uddhav Thackarey | 'लोकांना काम करणारं सरकार पाहिजे, घरी बसणारं नाही' Vidhansabha