राज्यात राजकीय वर्तुळात खलबतं सुरु असतानाच शिवसेना आणि शिंदे गटातील वाद दिवसांदिवस वाढतच चालला आहे. शनिवारी रात्री दादरमध्ये शिंदे गट आणि शिवसेना यांच्यात तुफान राडा झाला. या राड्यात पाच शिवसैनिकांना पोलिसांकडून अटक करण्यात आली होती. त्यानंतर रविवारी सकाळी शिवसेनेच्या नेत्यांनी दादर पोलीस स्टेशसमोर ठिय्या आंदोलन केले.
त्यामध्ये अनिल परब, अरविंद सावंत, किशोरी पेडणेकर हे नेते उपस्थित होते. त्यानंतर या पाच शिवसैनिकांची जामिनावर सुटका करण्यात आली.तर दुसरीकडे शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांच्याविरोधात गोळीबार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जमीन झालेल्या शिवसैनिकांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेतली आहे. यावेळी या शिवसैनिकांचे उद्धव ठाकरेंकडून कौतुक करण्यात आले आहे.
भेटीत काय घडलं सावंत यांनी दिली माहिती
जमीन मिळालेल्या शिवसैनिकांना मातोश्रीवर घेऊन गेलेले महेश सावंत यांनी भेटीनंतर माध्यमांशी संवाद साधला. तेव्हा ते बोलताना म्हणाले की, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना संयम बाळगा असा सल्ला दिला आहे. शिवसैनिक हेच शिवसेनेचे ब्रह्मास्त्र असे बोलत आपल्याला कुणाशी मारामारी करायची नाही, पक्ष वाढवायचा आहे, असे ठाकरे म्हणाले असल्याचे त्यांनी सांगितले. पुढे ते म्हणाले की, उद्धव ठाकरे हे आमचे गुरु आहेत, त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी आलो असल्याचे सावंत यांनी यावेळ सांगितले. पोलिसांनी त्यांचे कर्तव्य केले असेही सावंत यावेळी म्हणाले.
नेमकं काय होता वाद?
दरम्यान, गणेश विसर्जनाच्या दिवशी प्रभादेवीत शिंदे गट आणि शिवसेनेत झालेल्या वादावादीचे रुपांतर माराहाणीत झाले होते. यानंतर 25 शिवसैनिकांवर गुन्हा दाखल 5 जण अटक करण्यात आली आहे. यानंतर आज पुन्हा दादर पोलीस स्टेशन परिसरात दोन्ही गट समोरासमोर येत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. व शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांना अटक करण्याची मागणी शिवसैनिकांनी केली आहे. त्यांनतर आज आमदार सरवणकरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.