राजकारण

सत्तेसाठी स्वतःच्या आईच्या पोटावर लाथ मारणाऱ्या निष्ठुर...; ठाकरे गटाचा घणाघात

राज्यात अवकाळी पावसाळामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकरी चिंतेत ग्रासला आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या ऑफिशिअल ट्विटर पेजवरुन एक पोस्ट करण्यात आली आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : राज्यात अवकाळी पावसाळामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकरी चिंतेत ग्रासला आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या ऑफिशिअल ट्विटर पेजवरुन एक पोस्ट करण्यात आली आहे. यामध्ये शेतकऱ्यांना खचून न जाण्याचे आवाहन ठाकरे गटाने केले आहे. तर, शिंदे सरकारवर जोरदार टीका केली आहे.

काय आहे ठाकरे गटाची पोस्ट?

मायबापहो, महाराष्ट्रावर 'अवकाळी'चं संकट आहे. तुम्ही चिंतेत आहात. अगदी पोटच्या पोराप्रमाणे काबाडकष्ट करून ह्या फळबागा, पिकं तुम्ही वाढवलीत. त्यासाठी अतोनात मेहनत घेतलीत. ती अशी मातीमोल होताना बघून तुम्हाला गहिवरून येणं, दुःख होणं साहजिक आहे. पण खचू नका. आम्ही तुमच्यासोबत आहोत, असे ठाकरे गटाने म्हंटले आहे.

संकट आहेच. ते कुठं नसतं? पण ह्या संकटातही खंबीरपणे उभं राहण्याची ताकद तुम्हीच. बळीराजानंच तर आम्हाला दिलीय. अशा परिस्थितीत तुम्ही काही अविचार केला तर तुमच्यामागे असलेल्या तुमच्या कुटुंबाचं काय होईल? हा महाराष्ट्र तुमच्याकडे आशेनं पाहतोय. तुम्ही जगाचे अन्नदाते आहात. अशावेळी हा अन्नदाता हतबल झालेला आम्हाला पाहवेल का? कसं पाहवेल? नाहीच! त्यामुळे खंबीर रहा, असे आवाहन ठाकरे गटाने केले आहे.

सत्तेसाठी स्वतःच्या आईच्या पोटावर लाथ मारणाऱ्या ह्या निष्ठुर मिंधेंना काळ्या आईचं दुःख काय समजणार? असा निशाणा ठाकरे गटाने शिंदे गटावर साधला आहे. पण तुमच्यासारखंच इमानाने जगणाऱ्या निष्ठावंत शिवसैनिकांना आणि शिवसेनेला तुमची जाण आहे. अवकाळीचं हे संकट तात्पुरतं आहे. ह्या संकटावर मात करून खंबीरपणे जिद्दीनं उभं राहूया, असेही ठाकरे गटाने म्हंटले आहे.

Maharashtra Vidhan Sabha Result 2024 LIVE : काँग्रेसला मोठा धक्का; पृथ्वीराज चव्हाण पराभूत

Ajit Pawar: शरद पवारांना धक्का, बारामतीमधून अजित पवार विजयी

जालन्यात शिवसेना शिंदे गटाचे अर्जुन खोतकर विजयी

Sanjay Upadhyay Wins: बोरिवलीमधून संजय उपाध्याय विजयी

Bachhu Kadu: अचलपूरमधून बच्चू कडू यांचा पराभव