राजकारण

हे लोक कलंकच; उध्दव ठाकरे विधानावर ठाम, सरकारचं डोकं ठिकाणावर...

उध्दव ठाकरेंचे भाजपला प्रत्युत्तर

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : उध्दव ठाकरे यांनी नागपुरातील सभेत हा तुमच्या नागपूरला कलंक आहे, अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांवर टीका केली. यावरुन भाजप पक्ष आक्रमक झाला असून उध्दव ठाकरेंवर कलंकीचा काविळ म्हणत जोरदार टीका करण्यात येत आहे. याला उध्दव ठाकरेंनी पत्रकार परिषदेद्वारे उत्तर दिले आहे.

फोडाफोडीचे राजकारण विषयी लोकांच्या मनात तीव्र राग आहे. जिथे जिथे की जातोय तिथे छोटेखानी सभा होतायत. काल सुद्धा मी बघितलं घरात सुख शांती समाधान कसं नांदेल हे कोणी बघत नाही. फक्त सरकार आपल्या दारी म्हणून जातात. योजना लोकांपर्यंत पोहोचतात का हे पाहण्यासाठी मी माझ्या कार्यकर्त्यांना कार्यक्रम दिलाय. सरकार दारी येत असेल पण घरात त्या योजना पोहोचतात का? हे पाहायचं आहे. जनतेचा लोकशाहीवर असलेला विश्वास उडाला तर लोक रस्त्यावर उतरतील, असा इशारा त्यांनी दिला आहे.

इतकं वाईट वाटण्यासारखं काय आहे? भ्रष्ट माणसाला तुम्ही भ्रष्ट म्हणता की नाही? हसन मुश्रीफ त्यांच्या मांडीला मांडी लावून बसलेत. लोकांना कलंकित करून तुम्ही नंतर त्यांच्यासोबत बसता मग तुम्ही कलंकित नाही का? त्यांना तुम्ही आता मंत्री केलंय. मग ते भ्रष्ट नव्हतेच का, असा सवाल उध्दव ठाकरेंनी उपस्थित केला आहे. आता यांना मिरची पण गोड लागू लागली. हे राष्ट्रवादीचे 9 आमदारांमुळे शिंदेंच्या नाकी नऊ आलेत, असेही त्यांनी म्हंटले आहे.

लोकमान्य टिळक पुरस्कार पंतप्रधान मोदींना जाहीर झाला. शरद पवार यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात येणार आहे. मग आता 70 हजार कोटींच्या घोटाळ्याचे काय झालं? सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का? हे लोकमान्यांचे वाक्य आज आठवतं. हा प्रश्न कोणाला विचारणार, असा खोचक प्रश्नही त्यांनी विचारला आहे.

माझ्या ऑपरेशनवरून माझी चेष्टा करतात. कोणाचा कंबरेचा पट्टा निघाला, कोणाचा गळ्याचा पट्टा निघाला. मला जे भोगावं लागलं ते त्यांना भोगायला लागू नये अशीच माझी इच्छा आहे. माझं म्हणणं आहे की, हे लोक कलंक आहेतच, असे पुनरुच्चार त्यांनी केला आहे.

एक जुनी आठवण आहे. वाघेला यांनी ज्यावेळी भाजपमध्ये वाद झालं होता तेव्हा वाघेला मातोश्रीवर येतील असं बोललं जात होतं. प्रमोद महाजन त्यावेळी मातोश्रीवर आले. बाळासाहेबांनी तेव्हा सांगितलं ते येणार नाहीत आणि आलेच तर काय करायचं ते मला माहिती आहे, असा किस्साही उध्दव ठाकरेंनी सांगितला आहे.

PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी 'या' दिवशी येणार पुणे दौऱ्यावर

राज्यात विधानसभेसाठी 7 हजार 995 उमेदवारांचे अर्ज दाखल

महायुतीकडून 286 ठिकाणी 289 उमेदवार रिंगणात

Maharashtra Swarajya Party | स्वराज्य पक्षाचे 49 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात | Lokshahi News

शरद पवार गटाचे उमेदवार मोहन जगताप-मनोज जरांगे पाटील यांची भेट