राजकारण

उध्दव ठाकरेंचे भाजपला खुले आव्हान; हिंमत असेल तर ठाकरेंपासून शिवसेना...

मालेगावमध्ये आज उध्दव ठाकरे यांची जाहीर सभा पार पडली आहे. यावेळी त्यांनी भाजपवर शरसंधान साधले आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

नाशिक : ठाकरेंपासून शिवसेना तोडू शकतो, असे भाजपला वाटत असेल तर तुमची ५२ काय १५२ कुळं खाली उतरली तरीही ठाकरेंपासून शिवसेना तुम्ही तोडू शकत नाही. हिंमत असेल तर प्रयत्न करून बघा, असे खुले आव्हान उध्दव ठाकरेंनी भाजपला दिले आहे. मालेगावमध्ये आज उध्दव ठाकरे यांची जाहीर सभा पार पडली आहे. यावेळी त्यांनी भाजपवर शरसंधान साधले आहे. भाजपचे नाव बदलून भ्रष्ट झालेली पार्टी असे ठेवावे, असाही निशाणा त्यांनी साधला आहे.

मुंबईतून वस्त्रोद्योग दिल्लीला हलवत आहे. यावर म्हणे फक्त आयुक्त दिल्लीला बोलवले आहे. आयुक्तालाय मुंबईतच राहणार आहे. मग हे आयुक्त काय दिल्लीत फुटपाथवर बसणार आहेत का? त्यांना मुंबई आणि महाराष्ट्रच वस्त्रहरण करायचं. महाराष्ट्राची अवहेलना कधीपर्यंत करणार? मिधेंना दिल्लीतून डोळे वटारले की... मी जास्त काही बोलत नाही, असे म्हणत उध्दव ठाकरेंनी शिवसेनेला डिवचले आहे.

निवडणूक आयोगाच्या डोळ्यात मोतीबिंदू झाला आहे. खेडनंतर मालेगावची सभा त्यांनी बघावी. भरपावसात हजारोच्या संख्याने प्रतिज्ञापत्र आपण दिले आहे. ही शिवसेना आहे. होय मी शिवसेनाच म्हणतोय. कारण शिवसेना माझ्या बापाने काढली. मिंद्धेच्या बापाने नाही. आजही न्यायालयात रामशास्त्री बाण्याचे कौतुक आहे. ज्या क्षणी न्यायालयातून रामशास्त्री संपेल त्यादिवशी लोकशाहीला श्रद्धांजली अर्पण करावी लागेल, अशी जोरदार टीका त्यांनी केली आहे.

चंद्रकांत पाटील यांनी म्हंटले मी हदयावर दगड ठेवला आहे. म्हणजे यांना मिंधे नको होते. आताचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिंदे गटाला निवडणुकीत 48 जागा देणार, असे सांगितले. अहो बावनकुळे किमान तुमच्या नावा एवढे किमान 52 तर द्या, असे म्हणत त्यांनी शिंदे गटाला डिवचले आहे. भाजपने जाहीर करावं की मिंधेंच्या नेतृत्वात निवडणूक लढवणार. ते जाहीर करा. आज भाजपाला मी आव्हान देतो आहे की जर त्यांना हे वाटत असेल की आपण ठाकरेंपासून शिवसेना तोडू शकतो. तुमची ५२ काय १५२ कुळं खाली उतरली तरीही ठाकरेंपासून शिवसेना तुम्ही तोडू शकत नाही. हिंमत असेल तर प्रयत्न करून बघा, असे खुले आव्हान उध्दव ठाकरेंनी भाजपला दिले आहे.

मी तर म्हणतो तातडीने निवडणुका घ्या. तुम्ही मोदींच्या नावे मतं मागा मी माझ्या वडिलांच्या नावाने मतं मागतो. बघू महाराष्ट्र कुणाला कौल देतो? स्वतःकडे कर्तृत्व शून्य. गद्दारी करून मुख्यमंत्री झाले तरीही तुम्हाला माझ्या वडिलांचं नाव वापरावं लागतं इकडेच तुम्ही हार झाली आहे. हा तुमचा पराभव आहे. ज्या शिवसेनेने तुम्हाला राजकारणात जन्म दिला. राजकारणातल्या आईच्या कुशीवर वार करणारे हे चोर धनुष्यबाण घेऊन तुमच्यासोबत फिरणार आहेत. लढाई मी समजू शकतो, असे जोरदार टीकास्त्र त्यांनी सोडले आहे.

बर झाले तुम्ही सांगितले गुजरातची निरमा पावडर शुद्ध करतो. म्हणून हे सगळे गुजरातला गेले वशिंग मशीनमध्ये धुवून आणले. पहिले तुमच्या पक्षाचे नाव बदला भाजप म्हणजे भारतीय जनता पार्टी नाही तर भ्रष्ट झालेली पार्टी असे ठेवावे, अशीही टीका उध्दव ठाकरेंनी केली आहे.

IPL Mega Auction 2025 Live: आयपीएल 2025 लिलावाचे थेट अपडेट्स

Lokshahi Marathi Live Update : शरद पवार यांची आज कराडमध्ये पत्रकार परिषद

नव्या मंत्रिमंडळांचा संभाव्य फॉर्म्युला 'LOKशाही मराठी'च्या हाती

महाराष्ट्रातील २८८ मतदारसंघातील पक्षनिहाय विजयी आणि पराभूत उमेदवारांची यादी

Railway Platform Yellow Strip: रेल्वे प्लॅटफॉर्मवर असणाऱ्या पिवळ्या पट्टीचा अर्थ काय माहित आहे? जाणून घ्या...