Santosh Banger | Shiv Sena Team lokshahi
राजकारण

आम्हाला सन्मानाने बोलवलं तर मातोश्रीवर आम्ही परत जाऊ, संतोष बांगर यांच्या वक्तव्यामुळे खळबळ

त्याच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधान

Published by : Shubham Tate

Santosh Banger : हिंगोलीतील कळमनुरी विधानसभा मतदारसंघातील शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी आता आणखी विधान केले आहे. एक उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आम्हाला सन्मानाने बोलवलं तर मातोश्रीवर (matoshri) आम्ही परत जाऊ, आम्हाला मातोश्रीवर परत जाण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील काही बोलणार नाहीत. त्याच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधान आले आहे. (uddhav thackeray matoshri a big statement by satosh bangar)

तर दुसरीकडे फुटीर गटातही दोन गट आहेत. एक गट असा आहे ज्यांना जबरदस्तीनं पळवून नेलं आहे, त्यांना परत यायचंय आणि दुसरा असा की ज्यांच्या राक्षसी महत्वाकांक्षा होत्या, तसेच बंडखोर आमदारांना अजूनही मातोश्रीचं दारं खुली आहेत, माफ करू असे विधान आदित्य ठाकरे यांनी केलं होतं. त्यामुळे आता वेगळ्याच राजकीय चर्चा सुरू झाल्या आहेत.

शिवसेनेत (Shivsena) फुट पडली असतांना आमदार संतोष बांगर (Santosh Banger) यांनी भावनिक भाषण केले होते. त्याशिवाय, त्यांनी आपल्या जिल्ह्यात बंडखोरांविरोधात जाहीर भूमिकाही घेतांना त्यांना रडूही कोसळले होते. आता ते शिंदे गटात (Shinde Group) दाखल झाले आहे. बांगर यांनी घेतलेल्या यु-टर्नमुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. यावर आता कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव मी शिंदे गटात गेलो असल्याचे स्पष्टीकरण आमदार संतोष बांगर यांनी दिले होते.

संतोष बांगर म्हणाले की, ज्या वेळेस बंडखोरीचे नाट्य घडलं त्यावेळी महाराष्ट्रातील मी पहिला आमदार असेल की मला उद्धव साहेबांनी आदेश दिला की तुम्ही तुमच्या जिल्ह्यात जा. मी जिल्ह्यात आल्यावर रडलो-भावनिक झालो. पण, मी संपूर्ण शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना विचारले. त्यावेळेस सगळ्यांनी सांगितले की, साहेब शिवसेनेचा मुख्यमंत्री होत आहे. बाळासाहेबांच्या मनातला मुख्यमंत्री व्हावा म्हणून तुम्ही तुमच एकनाथ शिंदे यांना अमूल्य मत द्याव म्हणून मी सर्व मतदारांच्या कार्यर्त्यांच्या आग्रहास्तव सगळ्याच्या मते निर्णय घेऊन मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हात बळकट केले आहेत, असे त्यांनी म्हंटले आहे.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी