Shahu Maharaj Team Lokshahi
राजकारण

उद्धव ठाकरेंनी यु टर्न मारला नाही; संभाजी राजेंच्या वडीलांचा खुलासा

Published by : Shweta Shigvan-Kavankar

कोल्हापूर | सतेज औंधकर : राज्यसभा निवडणुकीसाठीच्या उमेदवारीवरून राज्यात सध्या घमासान सुरू आहे. शिवसेनेने (Shivsena) दिलेली ऑफर नाकारल्यानंतर संभाजीराजे (Sambhaji Raje) यांनी आपण खासदारकीच्या निवडणुकीला सामोरं जाणार नसल्याची घोषणा केली आहे. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) राज्यसभा मला दिलेला शब्द फिरवला, असा थेट आरोप केला होता. परंतु, संभाजी राजेंचे वडील शाहू राजे (Shahu Raje) यांनी उद्धव ठाकरेंनी यू टर्न घेतला म्हणता येणार नाही, असे म्हंटले आहे.

शाहू महाराज म्हणाले की, उद्धव ठाकरेंबरोबर चर्चा झाल्यानंतर ड्राफ्ट म्हणजे कच्चा मसुदा तयार झाला. फायनल झालं असतं आणि मग विचार बदलला असता तर मग यू टर्न मारला असे म्हणता आलं असतं. पण, संभाजीराजेंनी अपक्ष लढावं यासाठी भाजपनेच त्यांना भाग पाडलं, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

काय म्हणाले होते संभाजीराजे?

उद्धव ठाकरे आणि माझ्यात काय संभाषण झाले, हे मला जाहीर करायचे नव्हते. पण मला आज बोलावे लागतेय. मी सांगतोय त्यापैकी एकही शब्द खोटा असेल तर मी उद्धव ठाकरे यांच्यासोबत शिवछत्रपतींच्या कोणत्याही स्मारकावर यायला तयार आहे.

उद्धव ठाकरे यांनी सुरुवातीला मला भेटण्यासाठी दोन खासदारांना पाठवले होते. मुंबईतील ओबेरॉय हॉटेलमध्ये आमची बैठक झाली होती. त्यावेळी मी शिवसेनेत प्रवेश करावा, असा प्रस्ताव खासदारांनी मांडला. तेव्हा मी त्यांना स्पष्टपणे नकार दिला. मी राज्यसभेची निवडणूक अपक्ष म्हणूनच लढणार, असे मी त्यांना सांगितले. त्यानंतर दोन दिवसांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मला फोन केला. त्यांनी मला वर्षा बंगल्यावर भेटायला बोलावले. मी मुख्यमंत्रीपदाचा मान राखून उद्धव ठाकरे यांना भेटायला गेलो. त्यावेळी आमच्यात तीन मुद्द्यांवर चर्चा झाली. तेव्हाही उद्धव ठाकरे यांनी मला, 'छत्रपती आमच्यासोबत हवेत', अशी इच्छा व्यक्त केली. तेव्हादेखील मी अपक्ष म्हणून लढणारच, असे स्पष्ट केल्याचे संभाजीराजे यांनी सांगितले होते.

Navratri 2024: नवरात्रोत्सवात दारापुढे सुंदर असे रांगोळीने पाऊले काढण्यासाठी "या" डिझाईन नक्की फोलो करा

"नाम"चा वर्धापन दिन, नाना पाटेकरांसह शिंदे, फडणवीस आणि दादा एकाच मंचावर

Navratri 2024 Colours: जाणून घ्या, दरवर्षीप्रमाणे यावर्षीच्या नवरात्रीचे नऊ रंग

Pandharpur: अन्न व औषध प्रशासनाच्या नियमानुसार लाडूचा प्रसाद

Varun Sardesai UNCUT|मुंबई विद्यापीठाचा टॉवर मंत्रालयासमोर झुकतोय,सिनेटवरुन वरुण सरदेसाईंचा हल्लाबोल