मुंबई : शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. हा निर्णय एकनाथ शिंदेंचा मोठा विजय मानण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर उध्दव ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार घणाघात केला आहे. आपली चोरी पचली म्हणून चोरांना आनंद झाला असेल. परंतु, ज्याला स्वतःची अशी काही मर्दांगनी नसते. तो नामर्दच अशी चोरी करु शकतो. म्हणून नामर्द कितीही माजला तरी तो मर्द होऊ शकत नाही. हे सत्य आहे, अशा शब्दांत त्यांनी शिंदे-फडणवीसांवर हल्लाबोल केला आहे.
उध्दव ठाकरे म्हणाले की, आता पुरते तरी धनुष्यबाण चोरलेले आहे. पण ते कागदावरचे आहे. पण, जे खरे धनुष्याबाण माझ्याकडेच आहे. ते कायमचे माझ्याकडे राहणार आहे. पहिल्यापासून आमच्याकडे एक चिन्ह नव्हते. माझ्याकडे अजूनही धनुष्यबाण आहे. हा धनुष्यबाण शिवसेनाप्रमुखांच्या देव्हाऱ्यांतील आहे. आज सुध्दा आमच्या पूजेत असलेला हा धनुष्यबाण आहे. याची पूजा बाळासाहेबांनी स्वतः केली आहे. याचे तेज, शक्ती दाखवल्याशिवाय राहणार नाही. याचा आम्हाला विश्वास आहे.
रावण आणि रामाकडेही धनुष्यबाण होते. परंतु, विजय सत्याचा झाला. आणि शंभर कौरव एकत्र आले तरी पांडव हरले नाही. सत्याचा विजय नेहमी होत आलेला आहे. आणि सत्याचा विजय हा होणार आहे. हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे अंध धृतराष्ट्र नाही. हा लोकशाहीचे असे वस्त्रहरण कदापी खपवून घेणार नाही. या निर्णयाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार आहोत.
आपली चोरी पचली म्हणून चोरांना आनंद झाला असेल. परंतु, ज्याला स्वतःची अशी काही मर्दांगनी नसते. तो नामर्दच अशी चोरी करु शकतो. म्हणून नामर्द कितीही माजला तरी तो मर्द होऊ शकत नाही. हे सत्य आहे. आम्ही जोपर्यंत सुप्रीम कोर्टात जात नाही. तोपर्यंत त्यांना आनंद साजरा करु द्या. शेवटी चोरबाजाराला मान्यता मिळणार असेल तर बाकीच्या बाजाराला काहीच अर्थ राहणार नाही. एकूणच सर्व बाजारबुणगे म्हणजे लोकशाही हे आपल्या देशाला परवडणारे नाही, असा जोरदार हल्लाबोल त्यांनी केला आहे.
शिवसेना संपली. परंतु, शिवसेना लेचीपेची नाहीये. म्हणून शिवसैनिकांनो खचू नका. ही लढाई शेवटपर्यंत लढावीच लागेल. विजय आपलाच होणार आहे. फक्त खचू नका जिद्द सोडू नका. मैदानात उतरलो आहे. आता विजयाशिवाय माघारी फिरायचं नाही. ही चोरी त्यांना पचणार नाही. जनता याचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही, असे उध्दव ठाकरेंनी म्हंटले आहे.