राजकारण

आरएसएसच्या कार्यालयात ते ताबा घेण्यासाठीच गेले असावे; उध्दव ठाकरेंची खोचक टीका

उध्दव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र सोडले आहे. तर सरसंघचालक मोहन भागवत यांना सल्लाही दिला आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशीमबाग कार्यालयाला भेट दिली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी डॉ. हेडगेवारांना अभिवादन केले. तर, दुसरीकडे शिंदे गटाकडून मुंबई महानपालिकेतील शिवसेना कार्यालयावर कब्जा करण्याचा प्रयत्न केला. यावरुन शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र सोडले आहे. तसेच, सरसंघचालक मोहन भागवत यांना सल्लाही दिला आहे.

उध्दव ठाकरे म्हणाले की, काल मुंबई महापालिकेत मिंधे गट गेला होता. आज तर आरएसएस कार्यालयात गेला होता. ज्यांच्यात कर्तृत्व नसते, स्वत: काही निर्माण करण्याची ताकद नसते ते सरळ सरळ चोऱ्या करतात किंवा दुसऱ्यांच्या गोष्टींचा ताबा घेतात. काहींच्या मनात न्यूनगंड असतो की आपण काही करू शकत नाही. मग, त्या न्यूनगंडाचे रुपांतर अहंगंडात होते. आणि दुसऱ्यांचे नेते, पक्ष, ऑफिस बळकवायचे, अशा शब्दांत उध्दव ठाकरेंनी शिंदे गटावर निशाणा साधला आहे.

उध्दव ठाकरे पुढे म्हणाले, मुख्यमंत्री आज आरएसएस कार्यालयात जाऊन आले. पण, मोहन भागवतांना मी सांगतोय की कार्यालयाचा कोपरा न् कोपरा तपासून बघा. कुठे लिंब टाकलेत का? कदाचित आज आरएसएसच्या कार्यालयातही ते ताबा घेण्यासाठीच गेले असतील, असा खोचक टोलाही त्यांनी एकनाथ शिंदेंना लगावला आहे.

शिंदेंची नजर फार वाईट आहे याचा आम्ही अनुभव घेतला आहे. जे काही चांगलं असेल, तर त्याचा कब्जा कसा घ्यायचा ही त्यांची वृत्ती आहे. कुठेही जायचं आणि ते बळकवायचा प्रयत्न करायचा. जणूकाही महाराष्ट्रात टोळ्यांचे राज्य आले की काय अशी भावना यायला लागली आहे. काल त्यांनी आमच्या पालिकेतल्या कार्यालयाचा ताबा घ्यायचा प्रयत्न केला. आज ते आरएसएसच्या कार्यालयात गेले होते. आरएसएस मजबूत आहे म्हणून ते ताबा घेऊ शकले नसतील. पण आरएसएसने काळजी घ्यायची गरज आहे, असा सल्लाही उध्दव ठाकरेंनी दिला आहे.

मेळघाटातील 6 गावांचा निवडणुकीवर बहिष्कार

मेळघाटातील 6 गावांचा निवडणुकीवर बहिष्कार

उद्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जाहीरनामा प्रसिद्ध होणार

Rohit Pawar : देवेंद्र फडणवीस नव्या युगातील जनरल डायर; रोहित पवारांची टीका

नृत्य दिग्दर्शक रेमो डिसोजाची गुन्हे शाखेकडून 6 तास चौकशी