uddhav thackeray Team Lokshahi
राजकारण

औरंगाबादेत उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर घणाघात; म्हणाले, सरकारची घोषणांची अतिवृष्टी...

पेंडापूर येथे उद्धव ठाकरे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी देखील संवाद साधला

Published by : Sagar Pradhan

राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. औरंगाबादमध्ये परतीच्या पावसामुळे जे काही शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्याची पाहणी ठाकरेंकडून करण्यात येत आहे. याच पाहणी दरम्यान उद्धव ठाकरेंनी शिंदे- फडणवीस सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. यावेळी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, सरकार घोषणांची अतिवृष्टी करत आहे. मात्र, राज्य सरकारकडे भावनांचा दुष्काळ आहे. अशी जोरदार टीका राज्य सरकारवर केली.

औरंगाबाद येथील पेंडापूर येथे उद्धव ठाकरे हे गेले असताना त्यांनी त्या भागातील परिस्थितीची पाहणी केली. त्यावेळी त्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी देखील संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, पाऊस किती पडेल हे सरकारच्या हातात नसते. दोन प्रकराच्या आपत्ती असतात. कोरडा दुष्काळ व अतिवृष्टी. अस्मानी संकटं आल्यानंतर त्याचं घरदार उघड पडू नये. हे सरकारच्या हातात असते. मात्र हे सरकार सांगते की, दुष्काळ जाहीर करावा. अशी परिस्थिती नाही. म्हणून मी पाहणी करायला आलो. ही माझी प्रतिकात्मक भेट आहे. असे ते यावेळी म्हणाले.

पुढे ते म्हणाले की, खरी परिस्थिती काय आहे राज्यातल्या जनतेला कळू द्या. रेशन घ्यायला पण, पैसे नाहीत. शिधा कुठूंन घेणार आता या मध्ये घोटाळा झाला नाही झाला हे नंतरच कळेल. 50 हजार रुपये हेक्टरी मदत मिळावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. या मागणीला शिवसेना पाठींबा देत असल्याहे ते म्हणाले. ऐन दिवाळीत सरकारकडं तुमच्याकडे लक्ष द्यायला वेळ नसला, तरी शिवसेना तुमच्या पाठीशी आहे.धीर सोडू नका. तर आत्महत्येचा विचार मनात आणू नका. उत्सव साजरे करताना प्रजेकडे पाहणं हे राज्य सरकारचे काम असते. असा धीर उद्धव ठाकरे यांनी यावेळी बोलताना शेतकऱ्यांना दिला.

Shirkant Shinde On Uddhav Thackarey | 'लोकांना काम करणारं सरकार पाहिजे, घरी बसणारं नाही' Vidhansabha

वायनाड पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींचा घवघवीत यश; मोडला राहुल गांधी यांचा रेकॉर्ड

Maharshatra Vidhansabha Result | राज्यात महायुतीला घवघवीत यश; मविआला मात्र मोठा धक्का

Maharashtra Assembly Election Result: भाजप ठरला किंगमेकर! जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Lokshahi Marathi Live Update : वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींचा विजय