राजकारण

...मग आता मुख्यमंत्र्यांनाही तुरूंगात टाकायचे का? उध्दव ठाकरे आक्रमक; म्हणाले, चुक ते चूकच

न्यायालयाने न्यायप्रशासनातील कामात हस्तक्षेप केल्याचा ठपका तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर ठेवला. याविरोधात उध्दव ठाकरेंनी आक्रमक भूमिका घेतली.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

नागपूर : नागपूर सुधार प्रन्यासमधील ८३ कोटी रुपयांचे भूखंड अवघ्या २ कोटी रुपयांना बिल्डरला वाटल्याबद्दल न्यायालयाने न्यायप्रशासनातील कामात हस्तक्षेप केल्याचा ठपका तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर ठेवला. याविरोधात शिवेसना पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंनी आक्रमक भूमिका घेत मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. आमच्या काळात नागपूर सुधार प्रन्यास प्रकरण झाले. तेव्हा मविआ सरकार असले तरी मंत्री तेच आहेत. चूक ते चुकच, असे त्यांनी म्हंटले आहे.

उध्दव ठाकरे म्हणाले की, कालच नागपूर खंडपीठाने दिलेला निर्णय गंभीर आहे. ज्याला न्यायालयाने स्थगिती दिली तो विषय न्यायप्रविष्ट आहे, असे न्यायालयाचे निरीक्षण नोंदविले आहे. असे व्हायला नको होते. पण, कायद्यानुसार झाले असेल तर मग स्थगिती का दिली? याचा ऊहापोह होऊ द्या. राजकीय हस्तक्षेप अयोग्य आहे. यानुसार त्यांनी पदावर राहणे योग्य नाही. विधान परिषदेत आमचा विरोधीपक्ष नेता उद्या विधानसभेत हा विषय मांडेल, असे त्यांनी म्हंटले आहे.

राजा तु चुकतो आहे. त्यांच्या चुकीचे परिणाम राजाला नाही राज्याला असतात. निधीचा मुद्दा पण महत्वाचा आहे. जनेतेच्या करातून हा शासकीय निधी येतो. त्यात असमानता असू नये. निर्णयाला स्थगिती देण्याची न्यायालयाला का गरज वाटली. नागपूर सुधार प्रन्यासने नकार दिला ही वस्तुस्थिती आहे. उपमुख्यमंत्र्यांनी जे कथानक सांगितले ते एकंदर निर्णय बघता अनुत्तरित आहे. पहाड तर खोदलाच ना तेव्हाच हे बाहेर आले. उद्या बघा विधानसभेत हा विषय येईल, असा टोलाही देवेंद्र फडणवीसांना लगावला आहे.

तर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात उत्तर देताना जेलमध्ये गेलेल्याचा राजीनामा नाही घेतला आणि माझा राजीनामा मागत आहे, असे म्हंटले होते. यावर बोलताना उध्दव ठाकरे म्हणाले, आमच्या काळात नागपूर सुधार प्रन्यास प्रकरण झाले. तेव्हा मविआ सरकार असले तरी मंत्री तेच आहेत. चूक ते चुकच. त्यांना तुरूंगात टाकले मग आता मुख्यमंत्र्यांना तुरूंगात टाकायचे आहे का? उगाच गुंतागुंत करु नका हा न्यायप्रविष्ट विषय आहे. त्यांच्यावर आरोप झाले की इतरांकडे बोट दाखवायचे, अशीही टीका उध्दव ठाकरेंनी केली आहे. न्यायालयात विषय असल्याने चौकशी समितीचा प्रश्नच नाही. हा विषय लावून धरणारच. काहीतरी थातुरमातुर उत्तर दिले. मग सरकारने हे उत्तर न्यायालयात का नाही दिले, असा सवालही त्यांनी विचारला आहे.

१६ तारखेला न्यायालयाने निकाल देणे, त्याचवेळी लोकायुक्त नेमण्याची चर्चा हा योगायोग आहे का? मग बावनकुळेंची इच्छा पूर्ण होतेय का? की, चंद्रकांत पाटलांच्या मनावरचा दगड दूर करताहेत, असा निशाणाही उध्दव ठाकरेंवर शिंदे-फडणवीसांवर साधला आहे.

Lokshahi Marathi Live Update : शिवसेनेची आज हॉटेल ताजलँडमध्ये बैठक

Sanjay Raut :इतिहास चंद्रचुड नायडूंना माफ नाही करणार | Maharashtra Vidhansabha Result

Malshiras Vidhansabha |'रणजितसिंह मोहिते पाटलांची पक्षातून हकालपट्टी करा'; भाजपची मागणी

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार? | Marathi news

आष्टी/बीड: निवडून येताच भाजपाचे नवनिर्वाचित आमदार सुरेश धस यांची पंकजा मुंडेंवर सडकून टीका