प्रशांत जगताप | सातारा : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. राज्यपालांविरोधात विरोधकांकडून निदर्शने करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर छत्रपती उदयनराजे भोसले रायगड आक्रोश आंदोलन करणार आहे. तत्पुर्वी त्यांनी राज्यपालांना लक्ष्य केले. एवढा संताप आलाय की तलवारीने एका एकाची मुंडकी छटावीशी वाटतात, अशा भाषेत त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
उदयनराजे भोसले यांनी रायगडला जाण्यापूर्वी जलमंदिर मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला वंदन करून प्रवासाला सुरुवात केली. यावेळी बोलताना ते म्हणाले, राज्यपालांनी केलेलं वक्तव्य ही गंभीर बाब आहे. आता किती सहन करायचं? पण, आता शिवाजी महाराजांचा अपमान सहन करणार नाही, असा इशारा उदयनराजेंनी दिला आहे. रायगडावर शिवप्रेमींच्या वेदना ऐकायला मिळतील. मला आता कोणाची परवा नाही. एवढा संताप आलाय की तलवारीने एका एकाची मुंडकी छटावीशी वाटतात, असा संताप त्यांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, पुण्यात राज्यपालांच्या दौऱ्यावरून हाय व्होल्टेज ड्रामा सुरु आहे. राज्यपालांविरोधात स्वराज्य राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्ष हा आक्रमक झाला थेट राजपाल भवनात घुसण्याचा प्रसत्न केला आहे. यावेळी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. तर, रुपाली ठोंबरे पाटील यांच्याकडून राज्यपालांना काळे झेंडे दाखविण्यात आले.