राजकारण

मोठी बातमी! उदय सामंत यांच्या बोटीचा मांडवा जेट्टीजवळ अपघात

अपघातावेळी बोटीत उद्योग मंत्री उदय सामंत व छत्रपती संभाजी राजे असल्याची माहिती

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मीनाक्षी म्हात्रे | मुंबई : उद्योग मंत्री आणि रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या स्पीड बोटीला मांडवा येथे अपघात झाला. चालकाचे बोटीवरील नियंत्रण सुटल्याने स्पीड बोट जेटीच्या खांबाला जाऊन धडकली. या अपघातावेळी बोटीत सामंतांच्या समवेत छत्रपती संभाजी राजे असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, बोटीचा वेग कमी असल्याने यावेळी सुदैवाने मोठी दुर्घटना घडली नाही.

अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयात शिवराज्याभिषेक सोहळा नियोजनासंदर्भातील बैठकीसाठी उदय सामंत गेट वे ऑफ इंडियावरून मांडवा येथे स्पीड बोटीने निघाले होते. यावेळी छत्रपती संभाजीराजे त्यांच्या समवेत होते. मांडवाजवळ पोहोचल्यावर चालकाने जेटीवर लावण्यासाठी बोट वळवली. मात्र, यावेळी चालकाचे बोटीवरील नियंत्रण सुटले आणि बोट जेटीच्या खालील खांबाना जाऊन धडकली. सुदैवाने बोटीचा वेग कमी असल्याने यावेळी मोठी दुर्घटना घडली नाही. नंतर मात्र बोट चालकाने बोटीवर नियंत्रण मिळवून बोट तरंगत्या तराफ्यावर सुखरूप लावली. तेव्हा सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला.

दरम्यान, याआधीही उदय सामंत बोटीच्या अपघातातून थोडक्यात बचावले होते. 20 जानेवारी रोजी उदय सामंत रायगड जिल्ह्यातील मांडवा येथून मुंबईत गेट वे ऑफ इंडिया असा प्रवास करताना त्यांची बोट भर समुद्रात बंद पडली होती. स्पीड बोटीची सर्व यंत्रणा बंद पडल्यानंतर बोटीच्या कॅप्टनला रेस्क्यूसाठी आपत्कालीन संदेशसुद्धा पाठवता येत नव्हता. सामंत यांच्या स्विय सहाय्यकाने मोबाईलची रेंज कमी असतानाही प्रयत्न करून दुसरी स्पीड बोट मागवली. व उदय सामंत यांना सुखरूप परत आणले होते.

Latest Marathi News Updates live: वांद्रे कुर्ला संकुल(BKC) मेट्रो स्टेशनच्या बाहेर आग

MNS Sabha Cancel | 'शिवाजी पार्क'वर सभेसाठी मिळालेली परवानगी मनसेने नाकारली | Marathi News

Ajit Pawar Baramati Assembly constituency: बारामतीत सातव्यांदा अजित पवार निवडणुकीच्या रिंगणात, युगेंद्र पवारांचा आव्हान

निवडणूक कर्मचाऱ्यांसाठी मेट्रो वनच्या वेळेत वाढ

Rohit Pawar : लवकरच महाराष्ट्र स्वराज्याकडे मार्गस्थ होईल