शिवसेनेचे बंडखोर आमदार आणि माजी मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांच्या कारवर शिवसैनिकांनी काल (2 ऑगस्ट) रात्री कात्रज चौकात हल्ला केला. या दगडफेकीत सामंत यांच्या कारची काच फुटली. कात्रज भागात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) एका कार्यक्रमासाठी आले होते. कात्रज भागात शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांची सभा मंगळवारी रात्री पार पाडली. शिंदे यांच्यासह सामंत आले होते त्यावेळीच हा हल्ला झाला. मात्र आता या हल्ल्यासंदर्भात पोलिसांकडे तक्रार दाखल केल्यानंतर सामंत यांनी ट्विटरवरून थेट शिवसेनेला इशारा दिलाय.
सामंत यांनी ट्विटरवरुन “गद्दार म्हणता तरी शांत आहे. शिव्या घालता तरी शांत आहे. आई वडिलांना शिव्या घातल्यात तरी शांत आहे. लोकशाहीत विचार बदलला म्हणून काय ठार माराल. शांत आहे म्हणजे हतबल आणि असाह्य नाही. काळ ह्याला उत्तर आहे. अंत पाहू नका,” असं ट्विट केलं आहे.
शिवसेनेच्या नेत्यांची वेगवेगळी भूमिका
असा हल्ला करणारा माझा एखादा सर्वसामान्य कार्यकर्ता असता तर मी कारवाई करायला सांगितली असती असंही सामंत यांनी या हल्ल्यासंदर्भात सांगितलं. तसेच निलम गोऱ्हे, सुभाष देसाई यासारख्या नेत्यांनी या हल्ल्यावर दिलेल्या प्रतिक्रियांचा संदर्भ देत सामंत यांनी शिवसेनेच्या नेत्यांची या हल्ल्यासंदर्भात वेगवेगळी भूमिका आहे याबद्दल मला काही बोलायचं नाही, असं म्हटलंय.