रत्नागिरी : शिंदे मुख्यमंत्री आहेत तोपर्यंतच त्यांची सत्ता आहे, असे विधान राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जयंत पाटील यांनी केले होते. या विधानाचा शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांनी समचार घेतला आहे. भरपूर वर्ष शिंदे मुख्यमंत्री राहणार आहेत. अजून २५ वर्ष शिंदे हेच मुख्यमंत्री राहणार आहेत, असे प्रत्युत्तर उदय सामंत यांनी दिले आहे.
जयंत पाटील यांचे वक्तव्य बरोबर आहे. त्यामुळे अनेक वर्ष शिंदेच मुख्यमंत्री राहणार आहेत. पुढचे २५ वर्ष शिंदेच मुख्यमंत्री राहणार यात शंका असण्याचे कारण नाही, असं म्हणत सामंतांनी जयंत पाटलांवर निशाणा साधला आहे.
औरंगाबादला मंत्रीपद मिळण हे लॉलीपॉप असल्याची टीका ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी शिंदे-फडणवीस सराकारवर केली आहे. याला शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. अंबादास दानवे हा त्यांचा अनुभव सांगत आहेत. त्यांचा अनुभव सांगताना ते आमच्यावर खापर फोडतायत. आमच्या माध्यमातून सांगत आहेत. पण तो त्यांचा अनुभव आहे, अशा शब्दात अंबादास दानवेंना उदय सामंत यांनी उत्तर दिलं आहे. अंबादास दानवे शिंदेंसोबतचे आहेत. शरीराने तिकडे असले तरी मनाना ते आमच्यासोबत असल्याचे त्यांनी म्हंटले आहे.
दरम्यान, शिवसेना-भाजप युतीने लढणार आहेत. एकमेकांचे कार्यकर्ते त्या-त्या मतदार संघात काम करत आहेत. त्यामुळे हा फायदा दोघांना होईल. संघटनात्मक काम केलं जातंय. समन्वयानं सारं सुरु आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री परिवक्व राजकारणी आहे. त्यामुळे आमच्यामध्ये कुणीही लुडबुड करु नये. महाविकास आघाडीनं त्यांची आघाडी सांभाळावी, अशी टीका उदय सामंत यांनी महाविकास आघाडीवर केली आहे.