विकास आयुक्त असंघटित कामगार मुंबई या ठिकाणी तुकाराम मुंढे यांची नवीन जागी नियुक्ती करण्यात आली आहे. अखेर पशुसंवर्धन व दुग्धविकास खात्याचे सचिव तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली करण्यात आली आहे. नेहमीच चर्चेत असलेले तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली केली. 16 वर्षात तुकाराम मुंढे यांची आतापर्यंत 20 वेळा बदली झाली आहे.
या बदलामुळे शेतकरी, पशुपालक व दुग्धव्यवसायिक यांच्या समोरील आव्हाने विचारात घेवून पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभागाची वाटचाल पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय उद्योजकतेच्या दिशेने होण्यासाठी चालना मिळणार आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करणे व त्याद्वारे त्यांची आर्थिक उन्नती साधणे तसेच पशुपालक ते उद्योजक होण्यासाठी मिळणारा लाभ, याबाबत सचिव श्री.मुंढे यांनी माहिती दिली आहे.