औरंगाबाद : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गचं उद्घाटन उद्या म्हणजेच 11 डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. परंतु, याआधीच औरंगाबाद येथील काही नागरिकांनी समृध्दी महामार्गाचे उदघाटन करण्याचा प्रयत्न केला आहे. नारळ फोडून आणि पूजा करून समृद्धी महामार्गाचे प्रति उद्घाटन केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते समृध्दी महामार्गाचे उद्घाटन होणार आहे. परंतु, त्याआधीच काही लोकांनी महामार्गाचे उदघाटन केले आहे. औरंगाबाद येथील हर्सूल सावंगी परिसरातील 14-15 नागरिकांनी समृद्धी महामार्गाचे समृध्दी महामार्गाचे प्रती लोकार्पण केले आहे. यावेळी नारळ फोडून आणि फटाके वाजवून हा प्रती लोकार्पण कार्यक्रम समृध्दी महामार्गावर संपन्न झाला. यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी राजे यांच्या घोषणा दिल्या.
दरम्यान, समृध्दी महामार्गाचा नागपूर ते शिर्डीपर्यंतचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. हा मार्ग १० जिल्ह्यांतील ३९२ गावांमधून धावेल आणि दोन शहरांमधील प्रवासाचा वेळ सात तासांपर्यंत कमी करेल. 11 तारखेनंतर सामान्य नागरिकांसाठी समृद्धी महामार्ग खुला होणार आहे. महाराष्ट्रासाठी बहुप्रतिक्षित समृद्धी महामार्गाचं उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे.