राजकारण

वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या १२ तासांत रद्द, फडणवीस म्हणाले, वसुली रॅकेट...

Published by : Team Lokshahi

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी काल काही पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. परंतु आज सकाळी या बदली आदेशांना स्थगिती देण्यात आली आहे. त्यावरुन फडणवीसांनी महाविकास आघाडी सरकारवर (maha vikas aghadi) हल्ला बोल केला. वसुली रॅकेटमुळे अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या का? त्याचं कारण समोर आलं पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.

राज्यातील पोलीस दलातल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बदली आणि पदोन्नतीचे आदेश काल काढण्यात आले होते. या आदेशाला १२ तासही लोटले नसताना पाच अधिकाऱ्यांच्या बदलीच्या आदेशाला स्थगिती दिली. त्यामुळे गृहखात्याच्या कारभाराबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित करुन भाजपाने यावरून महाविकास आघाडीवर टीका केली आहे.

माध्यमांशी संवाद साधतांना फडणवीस म्हणाले की, काही पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आणि सकाळी या बदली आदेशांना स्थगिती देण्यात आली आहे. मग या बदल्या वसुली रॅकेटमुळे झाल्या का? त्याचं कारण समोर आलं पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.

हिंदूंना टार्गेट केलं जातंय

अचलपूर येथील दंगली प्रकरणी भाजपपच्या शहराध्यक्षांना अटक केली आहे. त्यावरही फडणवीस म्हणाले, राज्यात इंग्रजांचं राज्य चालायचं, तसं पोलिसांचं राज्य चाललं आहे. लांगूलचालन हे सरकारचे मंत्री करत आहेत. त्यामुळे परिस्थिती वाईट होत आहे. लांगूलचालनामुळे दोन समाज एकमेकांच्याविरोधात उभे राहत आहेत. हिंदुंना टार्गेट करण्याचं काम अमरावतीत केले जात आहे. पोलिसांनी जात, धर्म न पाहता कारवाई केली पाहिजे, असंही त्यांनी सांगितलं.

राज्यपाल नियुक्त 7 आमदारांच्या शपथविधी विरोधात ठाकरे गट हायकोर्टात

शेतकरी नेते रविकांत तुपकर शरद पवारांच्या भेटीला; म्हणाले...

ज्येष्ठ अभिनेते अतुल परचुरे यांचं निधन; राज ठाकरे पोस्ट करत म्हणाले...

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजणार; आज केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद

बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणी मोठी अपडेट; आरोपींनी अभिनेता सलमान खानच्या घराचीही केली होती रेकी