संभाजीराजे छत्रपती यांच्या स्वराज्य पक्षाचा आज स्थापना दिवस असून पुणे शहरात स्थापना दिन सोहळा साजरा करण्यात येणार आहे.
स्वराज्य पक्षाला नुकतीच भारतीय निवडणूक आयोगाची पक्ष म्हणून मान्यता मिळालेली असून सप्तकिरणांसह पेनाची निब हे निवडणूक चिन्ह देखील देण्यात आलेले आहे.
संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र स्वराज्य पक्ष आगामी विधानसभा निवडणुकीस सामोरा जाणार आहेत. स्वराज्यला पक्षाचा दर्जा मिळाल्यानंतर हा पहिलाच स्थापना दिवस सोहळा असणार आहे.
स्वराज्य पक्षाचा सकाळी 11 वाजता स्थापना दिवस कार्यक्रम असणार असून संभाजीराजे छत्रपती या कार्यक्रमातून मार्गदर्शन करणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संभाजीराजे छत्रपती काय बोलणार हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.